Search This Blog

Friday, 18 November 2022

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज आमंत्रित

 मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 18 : राज्य शासनाने 29 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून त्यात वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केलेला आहे. यात विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रक्कम रुपये 75 हजार मर्यादेत अनुदान देय आहे.

सदर योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता 310 शेततळ्यांचे लक्षांक प्राप्त झाले असून शेततळ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचेशी सपंर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

००००

No comments:

Post a Comment