Search This Blog

Tuesday 22 November 2022

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

Ø 28,29 व 30 नोव्हेंबरला ऑनलाईन तर 9 डिसेंबर रोजी ऑफलाईन आयोजन

           चंद्रपूर, दि. 22 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दिनांक 28, 29 व 30 नोव्हेंबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक 9 डिसेंबर रोजी छात्रविर राजेसंभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा जिल्हा चंद्रपूर येथे ऑफलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

            ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर किंवा प्ले-स्टोअर वरील महास्वयंम(Mahaswayam) हे अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे व एम्पलॉयमेंटवर क्लीक करावे. त्यानंतर जॉब सिकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक व पासवर्ड ने साईन-इन /लॉगीन करावे. लॉगीन केल्यानंतर आपल्या प्रोफाइल होम पेजवरील पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर चंद्रपूर हा पर्याय निवडावा. चंद्रपूर जिल्ह्याची निवड करून फिल्टर बटनावर क्लीक करा. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर या ओळीतील ॲक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टींग) क्लीक करून आय ॲग्री हा पर्याय निवडावा. त्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय करावे.

ऑफलाईन रोजगार मेळावा 9 डिसेंबर रोजी

            ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 9 डिसेंबर 2022 रोजी छात्रविर राजेसंभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा जिल्हा चंद्रपूर येथे सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजता दरम्यान करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात नागपूर, पुणे व चंद्रपूर येथील नामांकित कंपन्या सहभागी होत असून सद्यस्थितीत त्यांचेमार्फत 250 रिक्त पदांची उपलब्धता दर्शविण्यात आली आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी स्वत:चे आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे छायाकिंत प्रतींसह उपस्थित राहावे.  रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होवून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment