Search This Blog

Friday 18 November 2022

भूमि अभिलेख विभागाची सरळसेवा भरती परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबरला

 

भूमि अभिलेख विभागाची सरळसेवा भरती परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबरला

Ø उमेदवारांनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे

चंद्रपूर,दि.18:  भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपीक संवर्गातील 2021 च्या सरळसेवा पदभरतीची ऑनलाईन परिक्षा दिनांक 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र भूमि अभिलेखचे अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in  यावर 14 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

            पात्र उमेदवारांनी संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करून प्रवेशपत्रावर नमुद केंद्रावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.

            भूमि अभिलेख विभागातील रिक्त पदांची जाहिरात 9 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 9 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईल अर्ज सादर केलेले आहेत. त्यानंतर अर्जदारांना 28 फेब्रुवारी ते 13 मार्च 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा वरीलप्रमाणे आयोजित करण्यात आली आहे.

            तरी उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र व परिक्षेची माहिती विभागाच्या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेण्याचे आवाहन भूमि अभिलेख विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment