मोटार सायकल भंगारमध्ये विक्रीसाठी निविदा आमंत्रित
Ø पोलिस स्टेशन माजरी येथे 16 नोव्हेंबर रोजी होणार लिलाव
चंद्रपूर दि. 10 नोव्हेंबर : पोलिस स्टेशन, माजरी येथे बरेच कालावधीपासून बेवारस असलेले 30 मोटार सायकल वाहनाची 16 नोव्हेंबर 2022 रोजी लिलावाद्वारे भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक खरेदीदारांकडून सीलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत.
सदर भंगाराची शासकीय किंमत 53 हजार 800 रूपये मुल्यांकित करण्यात आली आहे. वाहने परिक्षण व अमानत रक्कमेचा भरणा 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत करता येणार आहे. भंगार वाहनाचा लिलाव 16 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन माजरी येथे करण्यात येणार आहे.
वाहनाचे इंजीन व चेचीस नंबर मिटवून व वाहनाचे तुकडे करून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. वरीलप्रमाणे नमुद स्थावर मालमत्तेची जशी आहे तशी, जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे तशी विक्री केली जाईल. जे खरेदीदार अमानत भरणा भरतील फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावमध्ये प्रवेश मिळेल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी तपशीलवार अटी व शर्ती वाचण्यात येईल. सदर वाहनांचा लिलाव मंजुर होईल, त्या खरेदीदारास उर्वरीत रक्कमेचा भरणा त्वरीत लिलावाचे ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील.
सदर लिलावाच्या बोली/ऑफर स्वीकारणे न स्वीकारणे लिलाव कायम करणे, पुढे ढकलने किंवा रद्द करणे व इतर कोणतेही कारण न देता सर्व अधिकार ठाणेदार पोलिस स्टेशन माजरी यांचे राहील, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हि.ए.घागे यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment