जमिनीच्या मोजणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करा
- जिल्हाधिकारी विनय गौडा
Ø जिल्ह्याकरीता 15 रोव्हर मशीन घेण्यास मान्यता
Ø मोजणी प्रकरणांची प्रलंबितता निकाली काढावी
चंद्रपूर दि. 10 : रोव्हर मशीनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जमिनीची मोजणी करून भूमि अभिलेख विभागाने मोजणी प्रकरणांची प्रलंबितता निकाली काढावी व नागरिकांना तत्परतेने सेवा द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी गुरवारी दिले.
जमीन मोजणीसाठी अर्ज केलेल्या मौजा वेंडली येथील गोपीचंद रघुनाथ नागापुरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांनी आज भेट दिली. याप्रसंगी भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रमोद घाडगे यांनी प्लेनटेबल, ईटीएस मशीन व रोव्हर मशीनद्वारे मोजणी कामाचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी यांना करून दाखविले.
रोव्हर मशीनने मोजणी काम अत्यंत कमी वेळात केले जाते. त्यामुळे जिल्हा नियोजन व विकास निधीतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्याकरीता 15 रोव्हर मशीन व इतर साहित्य घेणेस मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यावेळी भूमि अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक मिलिंद राऊत, भुकरमापक बोधीत्व रामटेके, अश्विन जामीनकर, मनोज भांदककर उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment