Search This Blog

Friday 4 November 2022

मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्राला समृद्ध करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार



 

मराठी चित्रपटनाट्यक्षेत्राला समृद्ध करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त कलावंतांचा केला सन्मान

मुंबई / चंद्रपूरदि.4 : महाराष्ट्रातील कलावंतांचीरंगभूमी व चित्रपट सृष्टीची भरभराट करण्यासाठी आणि या माध्यमातून चेहऱ्यावर हास्य फुलावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेतेदिग्दर्शकनिर्माते व सह कलाकारांचा श्री. मुनगंटीवार यांनी गुरुवारी मुंबई येथे सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.

 

 

यावेळी ज्येष्ठ अभिनेतेकवि किशोर कदमअक्षय बर्दापूरकरदिग्दर्शक शंतनू रोडे आदी दिग्गज कलावंत यावेळी उपस्थित होते. श्री मुनगंटीवार पुढे म्हणालेयावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत "मराठी" ने गौरवाचे स्थान मिळविले. या गुणी मराठी कलावंतांचा आज  सन्मान करताना अभिमानाने उर भरून येत आहे. जगात भारत हा सर्वात सुंदर देश आहे. सोबतच  आमचा जन्म ज्या महाराष्ट्रात झाला ती मायभूमी गुणवान आणि कर्तुत्ववान आहे.

दादासाहेब फाळके या मराठी माणसाने भारतीयांसमोर चित्रपट आणला. पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा देखील मराठी असल्यामुळे  या क्षेत्रात मराठीचं मोठं स्थान आहे. श्यामची आईसोंगाड्यापिंजरा या चित्रपटांची परंपरा आणि वैविध्यता अतुलनीय आहे. ही परंपरा आपण कायम ठेवू. नाट्य मंदिरे उत्तम करून रंगभूमी निश्चित संपन्न करू असा विश्वास श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

यावेळी अभिनेते किशोर कदमशंतनू रोडे  यांनी देखील मनोगत व्यक्त करून सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे अभिनंदन केले व हा सोहळा आयोजित केल्याबद्दल आभार मानले. आरोह वेलणकर यांनी संचालन केले.

००००००

No comments:

Post a Comment