मागासवर्ग
आयोगाचे सदस्य 19 नोव्हेंबर रोजी चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चंद्रपूर दि.
15 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲड. चंद्रलाल
मेश्राम, ॲड. बी.एल.किल्लारीकर व लक्ष्मण हाके हे आयोगाच्या कामानिमित्त चंद्रपूर
येथे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी चंद्रपूर येथे आगमन व सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत सिंदेवाही व मूल इत्यादी ठिकाणी आयोगास प्राप्त निवेदनाच्या जात समुहाची स्थळपाहणी. दुपारी 2 ते 3 वाजता जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपूर व सहायक आयुक्त समाजकल्याण यांची संयुक्त बैठक. दुपारी 3 ते 5 आयोगास प्राप्त निवेदनाच्या जात समुहाची स्थळपाहणी. रात्री चंद्रपूर येथे मुक्काम व दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता वर्धाकडे प्रयाण करतील.
०००००
No comments:
Post a Comment