दाताळा येथे नागरिकांचे सशक्तीकरण अभियानांतर्गत कायदेविषयक शिबिराचे आयोजन
चंद्रपूर, दि. 2 नोव्हेंबर: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तिकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायत दाताळा येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या अध्यक्षा एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव सुमित जोशी, अॅड. महेंद्र असरेट व नागरिक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी अॅड. महेंद्र असरेट यांनी उपस्थित नागरिकांना अभियानाचे हेतू व महत्त्व समजावून सांगितले तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार यांची माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी वैकल्पिक वाद निवारण पद्धत तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार व हक्क याबाबत माहिती सांगितली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या कामकाजाची तपशीलवार माहिती सांगून दि. 12 नोव्हेंबर रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार ग्रामसेवक गणेश कोकोडे यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment