Search This Blog

Friday, 25 November 2022

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 25 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अनुसूचित जातीतील मांग, मातंग व या समाजातील बारा पोटजातीतील लाभार्थी यांचेकडून 2 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.

            कर्ज प्रकरण एक लक्ष रुपये मर्यादेत विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येणार आहे. इच्छुकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जल नगर, चंद्रपूर येथे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात रीतसर अर्ज सादर करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment