Search This Blog

Friday, 29 August 2025

शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी योजना’ जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात


शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी योजना जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूरदि. 29 : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने सन 2025-26 पासून कृषि समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहेजिल्ह्यासाठी या योजनेत एकूण 145 कोटींची तरतूद करण्यात आली असूनयामध्ये 129.07 कोटी प्रचलित योजनांसाठी तर 16.13 कोटी स्थानिक गरजांनुसार तयार होणाऱ्या योजनांसाठी उपलब्ध होणार आहेत.

ही योजना भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा उभारणेउत्पादन खर्च कमी करणेउत्पादकता वाढविणेपिकांचे विविधीकरण करणेमूल्य साखळी बळकट करणेहवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देणे, अशा अनेक उद्दिष्टांसाठी राबविली जाणार आहेसूक्ष्म सिंचनहवामान अनुकूल बियाणेजमिनीची सुपीकता व्यवस्थापनकमी खर्चिक यांत्रिकीकरणडिजीटल व काटेकोर शेतीकृषी हवामान सल्लागोदाम व लॉजिस्टिक्सप्रक्रिया व निर्यात या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना अंमलबजावणीतून होणारी खर्च बचत ही कृषि समृद्धी योजनेसाठी वापरली जाणार आहेमंत्रिमंडळाच्या 29 एप्रिल 2025 च्या बैठकीत राज्यासाठी पुढील पाच वर्षांत दरवर्षी 5 हजार कोटीअसे एकूण 25 हजार कोटींची तरतूद या योजनेसाठी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनांच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणीबाबतची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जीसीयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालीजिल्ह्यातील स्थानिक गरजासंसाधने आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन तालुकानिहाय योजना तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश घायगुडेजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकराव तोटावारकृषि उपसंचालक चंद्रकांत ठाकरेकृषि विकास अधिकारी विरेंद्र राजपूतजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉप्रमोद जल्लेवारसहाय्यक निबंधक एलआरवानखेडेतंत्र अधिकारी मेघा ताटीकुंडलवार तसेच कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी सुरेश गरमडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू

Ø थांबविलेले लाभ पुर्ववत करण्यासाठी मोहीम  

Ø यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 29 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहेशासनाकडून जिल्हास्तरावर या योजनेच्या लाभार्थींचे वय पडताळणी यादी व एका परिवारातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी यादी प्राप्त झाली आहे.

त्याअनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्यामार्फत अंगणवाडी सेविकामदतनीस व पर्यवेक्षिका यांच्याकडून लाभार्थींचे पडताळणीचे कार्य सुरू आहेया पडताळणीकरिता यंत्रणेस सहकार्य करावेजेणेकरून लाभार्थीचे शासन स्तरावरून थांबविलेले लाभ पूर्ववत सुरू करता येईलअधिक माहिती करिता तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मेयांनी केले आहे.

००००००

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि.29 : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावाग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करून द्याव्यातवाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉबाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉशियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉएसआररंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्रपुरस्कार देण्यात येतात.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे लक्ष रुपये, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजार रुपये रोख रक्कमसन्मानचिन्हप्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येतेराज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख रक्कमसन्मानचिन्हप्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

सन 2024-25 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालयेकार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्रयांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

००००००

वन स्टॉप सेंटरकरीता वाहनाची आवश्यकता

 

वन स्टॉप सेंटरकरीता वाहनाची आवश्यकता

Ø सात दिवसांच्या आत दरपत्रक निविदा सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 29 :  केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेतील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याचे उद्देशाने वन स्टॉप सेंटर ही योजना चंद्रपुर जिल्ह्यात कार्यरत आहेया योजनेअंतर्गत कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलालैंगिक शोषणाच्या पिडीतमानवी वाहतुकीस बळी पडलेल्याअॅसिड हल्ल्यातील पिडीत महिलालैंगिक शोषणाच्या पिडीत महिलेस तात्काळ वैद्यकीय सुविधापोलिस मदत मिळावी तिचे समुपदेशन व्हावेतात्पुरता निवास सेवाकायदेशीर सेवा व आपात्कालीन मदत इत्यादी सेवा उपलब्ध करून वन स्टॉप सेंटर येथे कामकाज सुरू आहे.

वन स्टॉप सेंटर येथे येणाऱ्या पिडीत महिलेला उपरोक्त सेवा तातडीने पुरविण्यास तथा सदरील परिस्थिती हाताळण्यासाठी संकटाच्या ठिकाणावरून त्यांची सुटका करणेगृहचौकशी करणेकुटुंबात पुनर्स्थापना करणेरुग्णालयन्यायालयपोलिस स्टेशनतथा इतर आवश्यक ठिकाणी जाणे-येणे तसेच सदरील योजनेची जिल्ह्यात जाणीव जागृती व प्रसिध्दी करणे इत्यादी बाबी तथा कार्यालयासाठी भाडेतत्वावर वाहनाची आवश्यकता आहे.             

तसेच भाडेतत्वावरील वाहनांवर वन स्टॉप सेंटरचा पत्तादुरध्वनी क्रमांकभ्रमणध्वनी क्रमांककेंद्राच्या कार्याची थोडक्यात माहिती दर्शवायची आहेजेणेकरून गरजू महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क करणे सोईचे होईल. त्याचप्रमाणे सदरील वाहनावर योजनेचा लोगो व इतर आवश्यक माहिती दर्शवून ब्रँडींग करणे आवश्यक आहेतथापिवन स्टॉप सेंटर हे २४x७ कार्यरत असल्याने यासाठी उपलब्ध करून घ्यावयाचे वाहन देखील २४x७ केंद्रावर उपलब्ध असणे आवश्यक आहे. सदरचे वाहन ७ (+व्यक्तीची क्षमता असलेले SUV वाहन व तीन वर्षापेक्षा जास्त जुने नसावेवरीलप्रमाणे वाहन उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक वाहनास (वाहनचालकासह व इंधनासहरु. 4 लक्ष 50 हजार वार्षिक दर केंद्र शासनाने निश्चित केला आहे.

अटी व शर्ती : 1. पुरवठाधारकांनी प्रादेशिक परिवहन विभागाचे ऑल इंडिया परमिट असलेले वाहन सेवेसाठी द्यावे. सदर वाहन 3 वर्षापेक्षा जुने नसावे. 2. सदरचे वाहन २४ ७ वन स्टॉप सेंटरला ठेवण्यात यावे. 3.  वाहन चालक निर्व्यसनी असावा. 4. वाहनात इंधन व वाहनचालकाचे मानधन हे सर्व पुरवठाधारकास करावे लागेल. 5. वाहनावर योजनेची माहिती संबंधित स्टीकर व इतर माहिती चिटकविण्यात येईल, त्यास पुरवठाधारकाने मनाई करू नये. 6. सदर वाहनाचा वापर इतर कामासाठी करता येणार नाही. 7. शासनाने वाहनाचे वार्षिक भाडे लक्ष 50 हजार रुपये ठरवून दिलेले आहेत्यापेक्षा कमी दराचे दरपत्रक प्राप्त झाल्यास कमी दराचे दरपत्रकास प्राधान्य देण्यात येईल. 8. वाहन ना-दुरुस्त झाल्यास 5 दिवसात दुरुस्त करावे व सेवा उपलब्ध करून द्यावी अन्यथा त्याचे भाडेकरार संपुष्टात येईल. 9. वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या अनुदान उपलब्धतेनुसार त्याचे भाडे अदा करण्यात येईल.

उपरोक्त प्रमाणे सदरील वाहनाबाबत अटी व शर्ती मान्य असेल अशा वाहनधारकाने सदरील जाहिरात वर्तमानपत्रकात प्रसिध्द झाल्यापासून सात (7) दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीचंद्रपुर यांचे कार्यालयआकाशवाणीचे मागेचंद्रपुर या कार्यालयाशी संपर्क साधुन कार्यालयीन वेळेत निविदा/दरपत्रक सादर करावेअसे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुला-मुलींकडून शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित


 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुला-मुलींकडून शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि. 29 : सन 2025-26  या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण या कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेचंद्रपूर जिल्ह्यातील वरोराचंद्रपूरसिंदेवाहीराजुराब्रम्हपुरी येथील मुलांचे वसतिगृह आणि चंद्रपूरमुल बल्लारपूरचिमूरब्रम्हपुरी येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक यांनी व्यावसासयिक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाचे अर्ज https://hmas.mahait.org पोर्टलद्वारे भरण्यात यावे.

वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत 15 सप्टेंबर पर्यंत असून 18 सप्टेंबर 2025 रोजी प्रवेशाची यादी प्रसिध्द करण्यात येईलअसे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

युवक युवतींना इस्त्रायलमध्ये नोकरीची संधी


युवक युवतींना इस्त्रायलमध्ये नोकरीची संधी

चंद्रपूरदि. 29 :  कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्त्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहेया विभागाच्या https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर Latest Jobs या विकल्पाद्वारे उमेदवारांना अर्ज करता येईल.

इस्त्रायलमध्ये होम हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासांठी सुमारे हजार नोकरीच्या संधीदीड लाखापर्यंत मासिक वेतनाची संधी व या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेयासाठी इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेतसोबतच उमेदवारांकडे काळजी वाहू (घरगुती सहायकसेवांसाठी निपुन/पारंगतभारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायझरी मधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंगफिजिओथेरेपीनर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहेतसेच  जीडीए /एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सीग पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी वरिल लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.

००००००

Thursday, 28 August 2025

‘आदि कर्मयोगी अभियान’ मध्ये जिल्हा अग्रेसर राहावा - जिल्हाधिकारी विनय गौडा



 आदि कर्मयोगी अभियान’ मध्ये जिल्हा अग्रेसर राहावा जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करण्याचे निर्देश

चंद्रपूरदि. 28 : सन 2047 पर्यंत विकसीत भारत घडविण्यासाठी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता होणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे. या अभियानात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने नियोजन सभागृह येथे आयोजित तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ‘आदि कर्मयोगी अभियान’ हे केंद्र शासनाचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. या अंतर्गत मास्टर ट्रेनर तयार करून तसेच लोकांचा सहभाग घेऊन प्रत्येक आदिवासी गावातील समस्यांची मांडणी असलेले डॉक्युमेंट तयार केले जाईल. जेणेकरून ‘विकसित भारत – 2047’ च्या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये त्याचा समावेश करता येईल. त्यासाठी राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामस्तरावर तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या अभियानात 1. पीएम जनमन योजना, 2. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, 3. राष्ट्रीय सिकलसेल उच्चाटन मोहीम आणि 4. एकलव्य निवासी शाळांचा विस्तार आणि शिष्यवृत्ती या व इतर योजनांचे एकत्रिकरण करून व्हीजन डॉक्युमेंट तयार करावयाचे आहे. मुख्य म्हणजे यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांची मुख्य जबाबदारी राहणार आहे. केंद्र आणि राज्य स्तरावरून या अभियानाचा नियमित पाठपुरावा सुरू असून 2 ऑक्टोबर 2025 च्या ग्रामसभेत हा आराखडा मंजूर करून घ्यावयाचा आहे. त्यामुळे यात प्रत्येक यंत्रणेचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी योग्य समन्वय व सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.  

प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे तर पीएम जनमन योजनेत 68 गावांचा समावेशा आहे. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, रोजगार, पाण्याची उपलब्धता करणे आाणि शासनाशी संपर्क ठेवण्यासाठी ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यशाळेला सर्व विभागांचे प्रमुख, जिल्हास्तरीय तज्ज्ञ प्रशिक्षक, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

आदि कर्मयोगी अभियानाबाबत माहिती’ : आदिवासी भागात तळागाळातील शासन व सेवा वितरणामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडविणेआदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमांतर्गत नेत्यांचे कॅडर निर्माण करणेहा या अभियानाचा मुख्य उद्देश आहेसेवासमर्पण आणि संकल्प या तत्वावर हे अभियान राबविले जाणार असून आदिवासी भागांमध्ये प्रतिसादक्षम शासन आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचवली जाईलभारतामध्ये 10.5 कोटी आदिवासी नागरीक आहेतजे 30 राज्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहतातया आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण भारतात 20 लक्ष परिवर्तनशील नेत्यांचे मिशन आधारीत कॅडर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

००००००

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिष्यवृत्ती

 

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिष्यवृत्ती

सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

चंद्रपूरदि. 28 : सन 2025-26 मध्ये अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर, पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत चालू शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्यांकडून 18 जुलै 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहेसदर जाहिरातीस मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर 2025 आहेसदर अर्ज आयुक्तसमाजकल्याण, 3, चर्च पथपुणे – 01 यांच्या कार्यालयात सादर करावयाची असल्याचे सहायक आयुक्तविनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

Wednesday, 27 August 2025

चंद्रपूरमध्ये श्री. गणेश आरोग्य अभियानांतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरे


 चंद्रपूरमध्ये श्री. गणेश आरोग्य अभियानांतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरे

Ø 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान प्रमुख गणेश मंडळांमध्ये आयोजन

चंद्रपूरदि. 27 : श्री. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने "श्री गणेश आरोग्य अभियान" अंतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी ही शिबिरे भरविण्यात येणार आहेत.

या शिबिरांमधून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीवैद्यकीय सल्लाआयुष्यमान कार्ड काढणे तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळणार आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला डॉ. हेमचंद कन्नाके (निवासी वैद्यकीय अधिकारी)डॉ. निवृत्ती जिवने (वैद्यकीय अधीक्षकशासकीय वैद्यकीय महाविद्यालय)डॉ. मौहनिश गिरी (जिल्हा आरोग्य विभाग)डॉ. भूषण जैन (जिल्हा समन्वयकमुख्यमंत्री सहाय्यता निधी)डॉ. रुपेश कुमारवार (क्षेत्रीय व्यवस्थापक)डॉ. इंद्रजीत किल्लेदार (जिल्हा समन्वयकमहात्मा जोतीबा फुले जन व आयुष्यमान भारत योजना)डॉ. कविश्वरी कुंभलकर (अध्यक्षमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष) यांसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक मंडपांना भेट देतात. त्यामुळे थेट लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहेअसे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे यांनी सांगितले.

शिबिरांत सहभागी गणेश मंडळे :

* चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ

* जोड देऊळ गणेश मंडळपठाणपुराचंद्रपूर

* रेणुका माता गणेश मंडळभानापेठचंद्रपूर

* युवक गणेश मंडळगंजवार्डचंद्रपूर

* श्री हिवरपुरी सर्वोदय सार्वजनिक गणेश मंडळचंद्रपूर

* जय हिंद गणेश मंडळबालाजी वॉर्डचंद्रपूर

शिबिरांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपले आधारकार्ड तसेच शासकीय आरोग्य योजनांशी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीतअसे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावेळी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामुख्यमंत्री आरोग्य योजना आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे.

000000

Tuesday, 26 August 2025

गणेशोत्सवानिमित्त महिला बचत गटाचे प्रदर्शन


गणेशोत्सवानिमित्त महिला बचत गटाचे प्रदर्शन

चंद्रपूरदि. 26 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने जिल्हा परिषद आवारात महिला बचत गट व स्वयंसहायता समुह गटाने विविध वस्तुंचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

सदर प्रदर्शन 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान जिल्हा परिषद आवारात असणार आहेया प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकलेने निर्मित केलेल्या शाडू मातीपासून गणपतीच्या मूर्तीगणपतीचे डेकोरेशनसजावटीच्या वस्तू यासोबतच घरगुती चविष्ट खाद्यपदार्थहस्तकला वस्तूपारंपारिक अलंकार, कपडे आणि सेंद्रिय उत्पादने यांचा समावेश आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील विविध स्वयंसहायता समूह यांनीसुध्दा प्रदर्शनात भाग घेतला असून नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, 'बचत गट हा महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने येणारा प्रभावी मार्ग आहेया प्रदर्शनास चंद्रपूरच्या जनतेने अवश्य भेट देऊन वस्तूची खरेदी करावीअसे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहेसदर प्रदर्शन 28 ऑगस्ट 2025 पर्यंत सकाळी ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

००००००

निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द


निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द

Ø जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - 2025

चंद्रपूरदि. 26 : चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागासाठी निवडायची सभासद संख्या निश्चित करण्यात आली आहेत्यानुसार निवडणूक विभाग 56 व निर्वाचक गणाची प्रभाग रचना 112 आहे.

निश्चित केलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे अंतिम परिशिष्ट 8 (व 8 (मधील अधिसुचना व अनुसूची तयार करून ती शासन राजपत्रात 22 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयतहसील कार्यालयजिल्हा परिषद कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयातील सुचना फलक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरीता निवडायची सदस्य संख्या : चिमूर (जि.. – 5 सदस्यपं.. – 10 सदस्य), नागभीड (जि.. – 4, पं.. - 8), ब्रम्हपुरी (जि.. – 5, पं.. - 10), सिंदेवाही (जि.. – 4, पं.. - 8), भद्रावती (जि.. – 4, पं.. - 8), वरोरा (जि.. – 5, पं.. - 10), चंद्रपूर (जि.. – 5, पं.. - 10), मुल (जि.. – 3, पं.. - 6), सावली (जि.. – 4, पं.. - 8), पोंभुर्णा (जि.. – 2, पं.. - 4), गोंडपिपरी (जि.. – 3, पं.. - 6), बल्लारपूर (जि.. – 2, पं.. - 4), कोरपना (जि.. – 4, पं.. - 8), जीवती (जि.. – 2, पं.. - 4) आणि राजुरा (जि.. – 4, पं.. - 8).

००००००

प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनेवर 'अंतर्गत तक्रार समिती' स्थापन असणे अनिवार्य

 प्रत्येक शासकीयनिमशासकीय व खाजगी आस्थापनेवर 'अंतर्गत तक्रार समितीस्थापन असणे अनिवार्य

चंद्रपूरदि.26 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून सरंक्षण (प्रतिबंधमनाई आणी निवारणअधिनियम, 2013 अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीयनिमशासकीय व खाजगी आस्थापनाजेथे 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक आस्थापनेवर अंतर्गत तक्रार समिती स्थापन असणे अनिवार्य आहे.

         

समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकारी अध्यक्ष असावीमहिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव व कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांमधून किमान दोन सदस्यतसेच अशासकीय संघटना किंवा लैगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्ती यामधील एक सदस्य असावासमितीमध्ये किमान 50 टक्के सदस्य महिला राहतील व समितीचा कार्यकाल हा तीन वर्षाचा राहिल.

          ज्या कार्यालयात 10 पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत, अशा कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी स्थानिक तक्रार समिती व जिल्हा महिला व वाल विकास अधिकारी चंद्रपुर यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावीसदर अंमलबजावणीत कुणी कसुर केल्यास 50 हजार पर्यंत दडांत्मक कारवाईचे तरतुद कायद्यात नमूद आहे.

            निवासी उपजिल्हाधिकारीचंद्रपुर या कायद्यांतर्गत जिल्हा अधिकारी, POSH ACT म्हणून नामनिर्देशित असून नोडल अधिकारी म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी (सर्वव मुख्याधिकारीनगर परिषद क्षेत्र यांना नेमण्यात आले आहेउपरोक्त कायद्यान्वये पिडीत महिलेस काही अडचण असल्याससदर महिला नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकते किंवा https://shebox.wcd.gov.in या Web Link वर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकते.

शासन स्तरावर अंतर्गत तक्रार समितीची ऑनलाईन अपडेट करण्याची कार्यवाही सुरू आहेत्यासाठी शासकीयनिमशासकीय व खाजगी कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून तशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयजुना कलेक्टर बंगलाआकाशवाणीच्या मागेचंद्रपुर (disttdwcdocha@gmail.com किंवा disttwedo_cha@rediffmail.comयेथे सादर करावीअसे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.

००००००

स्क्रब टायफसबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

 

स्क्रब टायफसबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 26 : किटकजन्य आजारातील स्क्रब टायफस हा जिवाणूंमु‌ळे होणारा व माइट्सद्वारा प्रसारीत होणारा आजार आहेज्याला बुश टायफस असेही म्हणतात. ओरिएंटिया सुत्सुगामुशी हा जिवाणूसंक्रमित चिगार (माइट्सच्या अळ्याद्वारे प्रसारित होतोपावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आले आहेतस्क्रब टायफस या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अधिक सतर्क राहून सर्व प्रकारच्या उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहेअसे  आवाहनआरोग्य विभागाने केले आहे.

संक्रमण : संक्रमित चिगर (माइट्सची अळी माणसाला चावताच जिवाणू रक्त प्रवाहात प्रवेश करतात आणि पुनरुत्पादन करण्यास सुरवात होते. ज्यानंतर स्क्रब टायफस आजाराची लक्षणे दिसू लागतात.

जोखमीचे घटक : शेतात काम करणारे व जंगलात काम करणारे मजूरगावाच्या टोकाला राहणारेतोकडे कपडे घालणारे व्यक्तीपायात जोडे व हातमोजे न घालता काम करणारे व्यक्तीरोगप्रतिकारक शक्ती कमी असेलेल्या व्यक्ती इत्यादी.

स्क्रब टायफसची लक्षणे : स्क्रब टायफसची लक्षणे चिगर चावल्यानंतर 6 ते 21 दिवसांच्या आत दिसून येतातप्रभावी उपचारांसाठी लवकर निदान महत्वाचे आहेउपचार न केल्यास स्क्रब टायफसमुळे अधिक गंभीर लक्षणे दिसू शकतात. सर्वसाधारणतः डोकेदुखीथंडी वाजुन तीव्र ताप येणेमळमळशरीरात कंपण सुटणेलसिका ग्रंथीमध्ये सुजसांधेदुखीकोरडा खोकलानिमोनिया सदृश्य आजारचिगर चावल्याने खाज येणेअंगावर चट्टे येणेचिगारदंश झालेल्या ठिकाणी जखम होऊन खिपली येणे इत्यादी.

स्क्रब टायफसचे निदान : स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी रक्त जल तपासणी करण्यात येतेसदर तपासणीची सोय वैद्यकिय महाविद्यालयात उपलब्ध आहेप्रभावी उपचारांसाठी अचूक आणि वेळेवर निदान महत्त्वाचे आहेरुग्णांचे चिन्हबाहय लक्षणांवरून आणि रुग्णाच्या वास्तव्य इतिहासाची तपासणी केली जातेचिगर चाव्याच्या ठिकाणी व्रण असणे एक महत्वपूर्ण लक्षण आहे.

उपचार : स्क्रब टायफसचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहेप्रतिजैविके (Antibiotics) थेरेपी हा उपचाराचा आधारस्तंभ आहेयाकरिता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. रुग्णास येणारा अचानक तापशरीरातील कमी होणारी पाण्याची मात्रा यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहेउपचार न केल्यास किंवा उपचारास उशीर झाल्यास स्क्रब टायफसमुळे गंभीर गुतागुंत होऊ शकते, ज्यापैकी काही जीवघेणी असू शकतात.

नियंत्रण : स्क्रब टायफस चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंध करणे महत्वाचे आहेनिवासी क्षेत्राभोवती झाडे झुडपे नियमितपणे साफ करणेउंदिर हे ओरिएंटिया सुत्सुगामुशी साठीचे वाहक असून उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना : 1. स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यास किंवा ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे 2. पूर्ण बाहयांचे व शरीर पुर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत 3. घरात पाळलेल्या पाळीव प्राण्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी 4. घराचे आजुबाजुला वाढलेली अतिरिक्त झाडे झुडपे काढुन टाकावीत 5. शेतात व जंगलात काम करणारे मजुर यांनी पायात जोडे व हातमोजे घालावेत 6. कपडे बदलतांना किटक नसल्याची खात्री करावी 7. कपडे झटकुन घालावे 8. शेतात जंगलात काम करुन आल्यावर कपडे गरम पण्यात भिजवावेत 9. आवश्यकते नुसार परिसरात तन नाशककिटकनाशकाची फवारणी करावी 10. उंदिर नियंञण कार्यवाही करावी.

जनतेस आवाहन : वरीलप्रमाणे नमुद लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ वैद्यकिय सल्ला घेणे व उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहेनागरिकांनी सतर्क राहून लवकर निदानवेळेत उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार पूर्णपणे टाळता आणि नियंत्रित करता येऊ शकतोअसे जिल्हा हिवताप अधिकारी डॉप्रकाश साठे यांनी कळविले आहे.

००००००

1 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन

 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन

            चंद्रपूरदि.26 :  सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतेतसेच दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतेतक्रारदारांनी सर्वप्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे व तालुकास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निकाली निघाल्यानंतर व समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावे.

              सप्टेंबर 2025 या महिन्याचा पहिला सोमवार सप्टेंबर रोजी येत असल्याने या दिवशी दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच 15 दिवस आधी प्रतीत अर्ज सादर करावा. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीतद्नंतरच तक्रार अर्ज स्विकारण्यात येईलअसे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Monday, 25 August 2025

26 ऑगस्ट रोजी ‘फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह’

 26 ऑगस्ट रोजी फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह

चंद्रपूरदि. 25 : आधा घंटा रोजफिटनेस का डोज’ या संकल्पनेवर आधारीत चंद्रपूर जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच क्रीडा विभागाच्या व फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता सायकलथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सायकलिंग ड्राईव्ह सरदार पटेल हायस्कुल पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक - दुर्गापूर रोड- पद्‌मापूर गेट ते पोलिस सभागृह तुकूमपर्यत आयोजित करण्यात आली आहे.

या सायकलिंग मध्ये जिल्हा पातळीवरील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलिस कुटूंबियांचा सहभाग असणार आहे. तसेच शालेय विद्यार्थी आणि चंद्रपूर शहरातील गो ग्रीन सायकल ग्रपच्या सदस्यांचा सुध्दा सहभाग असणार आहे. सदर सायकलथॉन चा मुख्य उद्देश से नो टू ड्रग्ज डोज’ – ‘आधा घंटा रोजफिटनेस का डोज’ या संदेशाचा प्रसार करणे व फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे हा आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन नशामुक्त आणि फिटनेस जिल्हा बनविण्यास योगदान द्यावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

वन अकादमीमध्ये हवामान बदल व पर्यावरण संरक्षण विषयावर कार्यशाळा


वन अकादमीमध्ये हवामान बदल व पर्यावरण संरक्षण विषयावर कार्यशाळा

Ø शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांकरीता आयोजन

चंद्रपूरदि. 25 : चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन अकादमी) चंद्रपूर येथे हवामान बदल व प्रतिबंध (Climate Change and Mitigation)  या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेत बल्लापूर तालुक्यातील विविध शाळेतील 84 विद्यार्थी आणि 12 शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हवामान बदल व त्यांचे दुष्परिणाम या ‍विषयी विद्यार्थी  आणि शिक्षकांमध्ये जागरुकता  निर्माण व्हावी तसेच या गंभीर समस्येवर शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून वनप्रबोधिनी चंद्रपूरचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणाचे उद्घाटन अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा,  सत्र संचालक  एस. एस दहीवलेएस. के. गवळीखुशाल रामगीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी शालेय स्तरावर पयर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याचे महत्व पटवून दिले व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी समाजात पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. या कार्यशाळेत पर्यावरण व परिस्थितीकीहवामान बदल - कारणे व परिणाम त्यावरील प्रतिबंध व उपाययोजना हवामान बदल रोखण्यासाठी वन व वन्यजीव संरक्षणाचे महत्वटाकावू पदार्थाचे हरित पर्यावरणपूरक नियोजन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध वनस्पती आणी त्यांची हवामान समतोल व कार्बन शोषणात भूमिका व जैवविविधतेचे महत्त्व समजावून घेण्याची संधी मिळाली.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शालेय संस्थामधील विद्यार्थ्यांकरीता अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आयोजित करून युवा पिढीचा पर्यावरण संवर्धनात सक्रीय सहभाग वाढविण्याकरीता वन प्रबोधिनी प्रयत्नशील आहेअसे प्रतिपादन अपर संचालक उमेश वर्मा (प्रशिक्षण) यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र चेटूलेकुमार  पस्पुनुरवार आणी वन प्रबोधिनीतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

000000