Search This Blog

Saturday, 2 August 2025

महसूल दिनानिमित्त अधिकारी कर्मचा-यांचा सन्मान



 

महसूल दिनानिमित्त अधिकारी कर्मचा-यांचा सन्मान

Ø भद्रावती येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभ

भद्रावती (चंद्रपूर)दि. 2 : महसुल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट 2025 रोजी महसुल दिन तसेच 01 ते 07 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसुल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने भद्रावती तहसील कार्यालयामध्ये 1 ऑगस्ट रोजी अभियानाचा शुभारंभ आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश भांडारकर होते.

यावेळी श्री. भांडारकर यांनी  महसुल सप्ताहामध्ये घेण्यात येणा-या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. सदर कार्यक्रमामध्ये आमदार श्री. देवतळे यांच्या हस्ते महसुल विभागातील मंडळ अधिकारी अनिल दडमल,  समीर वाटेकरसहायक महसुल अधिकारी गजानन ढोबळेदेवानंद गावंडेप्रमोदिनी रामटेकेग्राम महसुल अधिकारी खुशाल मस्केविनोद चिकटेरवी तल्लारश्रीकांत गितेप्रतिक्षा लोखंडेमहसुल सहायक अमर श्रीरामेसमिक्ष पडगेलवारशिपाई शांताबाई मानुसमारे व महसुल सेवक सुरज शेंडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ग्राम महसुल अधिकारी अनिल श्रृगारे यांनी तर आभार नायब तहसिलदार मनोज आकनुरवार यांनी मानले. कार्यक्रमाकरीता गावातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment