युवक युवतींना इस्त्रायलमध्ये नोकरीची संधी
चंद्रपूर, दि. 29 : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्त्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. या विभागाच्या https://
इस्त्रायलमध्ये होम हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासांठी सुमारे 5 हजार नोकरीच्या संधी, दीड लाखापर्यंत मासिक वेतनाची संधी व या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजी वाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुन/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायझरी मधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरेपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जीडीए /एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सीग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी वरिल लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment