Search This Blog

Thursday, 21 August 2025

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 21 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. चंद्रपूर मार्फत अनुसूचित जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जातेचालू आर्थिक वर्ष 2025-26 करिता मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेअंतर्गत 80, बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 80, थेट कर्ज योजनेअंतर्गत 38 असे एकूण 198 लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुदान योजना प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये पर्यंत, सदर योजनेत 25 हजार रुपयांपर्यंत कर्ज बँकेतर्फे दिले जाते व 25 हजार रुपये अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

बीज भांडवल योजना : प्रकल्प मर्यादा 5 लक्ष रुपयापर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्क्यांनी व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचा समावेश आहे. 75 टक्के पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षात करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो

थेट कर्ज योजना प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये पर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 85 हजार रुपये कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के व्याजदराने देण्यात येतेसदर राशीमध्ये 10 हजार रुपये महामंडळाच्या अनुदानाचा समावेश आहे. कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावी लागते व टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो

वरील दिलेल्या योजनांच्या अर्ज भरण्याकरिता महामंडळाच्या mahadisha.mpbcdc.in या पोर्टल वर जाऊन अर्ज भरावे= अधिक माहिती करिता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे तसेच 07172-253549 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment