Search This Blog

Friday, 8 August 2025

ई- पीक पाहणी त्वरीत करून घेण्याचे आवाहन

 पीक पाहणी त्वरीत करून घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 8 :  शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे 7/12 उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहेमहाराष्ट्र शासनामार्फत महसुल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 2021 पासून संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत आहेकेंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.

सध्या खरीप हंगामातील पीक पाहणी कार्यवाही सुरू आहेखरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरुपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहेत्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲपचे  अपडेट करून घ्यावेखरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी 1 ऑगस्ट 1 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहेतथापिशेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतः पुर्ण करावीपीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यासआपल्या गावासाठी नेमणूक करण्यांत आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील.

तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते कीत्यांनी खरीप २०२५ ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पुर्ण करावीअसे चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment