Search This Blog

Tuesday, 5 August 2025

अवयव दानासाठी पुढाकार घ्या - शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे

 अवयव दानासाठी पुढाकार घ्या - शल्य चिकित्सक डॉचिंचोळे

चंद्रपूरदि. 5 : एक व्यक्ती मरणोत्तर आपल्या अवयवांचे दान करून आठ रुग्णांना नवीन जीवन देऊ शकतोहे खरेच महान कार्य असून प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजेअसे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळे यांनी केले.

जिल्हा रुग्णालयचंद्रपूर येथे अवयवदान दिनानिमित्त जिल्हास्तरीय उद्घाटन समारंभात ते बोलत होतेयावेळी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉभास्कर सोनारकरतसेच वैद्यकीय अधिकारी डॉबंडू रामटेकेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉहेमचंद कन्नाकेसमाजसेवा अधिक्षक उमेश आडे  उपस्थित होते.

यावेळी अवयवदानाचे महत्त्व विषद करतांना डॉचिंचोळ म्हणालेकिडनीहृदययकृत (लिव्हर), डोळेत्वचारक्तहाडेप्लाझ्मा इत्यादींचे दान करून आपण मरणोत्तर देखील अनेकांना जीवनदान देऊ शकतोतसेच NOTTO (National Organ and Tissue Transplant Organisation) ABDM या संकेतस्थळांवर जाऊन अवयवदानासाठी नागरिकांनी नोंदणी करावीअसे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ.हेमचंद कन्नाके यांनी केलेकार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीनर्सिंग स्टाफसमुदाय आरोग्य अधिकारीतसेच आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment