Search This Blog

Wednesday, 13 August 2025

18 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

 18 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

चंद्रपूरदि.13 : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे,  महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावीयासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येते.

ज्या महिलांचे तक्रार/निवेदन/अडचणी/ समस्या वैयक्तीक स्वरुपाचे असतीलअशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापुर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीचंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करावे. प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठवून प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात येईल. प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर व चवथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्या अनुषंगाने 18 ऑगस्ट  रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारीतथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांचे दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सदर महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment