Search This Blog

Friday, 29 August 2025

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुला-मुलींकडून शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित


 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुला-मुलींकडून शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि. 29 : सन 2025-26  या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण या कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेचंद्रपूर जिल्ह्यातील वरोराचंद्रपूरसिंदेवाहीराजुराब्रम्हपुरी येथील मुलांचे वसतिगृह आणि चंद्रपूरमुल बल्लारपूरचिमूरब्रम्हपुरी येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक यांनी व्यावसासयिक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाचे अर्ज https://hmas.mahait.org पोर्टलद्वारे भरण्यात यावे.

वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत 15 सप्टेंबर पर्यंत असून 18 सप्टेंबर 2025 रोजी प्रवेशाची यादी प्रसिध्द करण्यात येईलअसे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment