Search This Blog

Tuesday, 19 August 2025

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

 

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

Ø जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व तहसीलदार व संबंधित यंत्रणेला निर्देश

चंद्रपूरदि. 19 : प्रादेशिक हवामान केंद्रभारतीय हवामान खातेनागपूर यांनी आज (दि.19 ) चंद्रपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तसेच उद्या (दि.20 ) येलो अलर्ट दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटीसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीघर व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष  विनय गौडा यांनी महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार  नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.

000000

No comments:

Post a Comment