Search This Blog

Wednesday, 13 August 2025

सर्वांच्या सहकार्यातून ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे


 सर्वांच्या सहकार्यातून हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे

चंद्रपूरदि. 13 : तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असून भारताच्या ऐक्य व विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा आहे. नागरिकांमध्ये राष्ट्राभिमानदेशभक्ती आणि राष्ट्रीय ध्वजाविषयी आदर निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियानात समग्र सहभागातून यशस्वी करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितिन व्यवहारे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकी ते बोलत होतेयावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त विपीन पालिवालअतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडेनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारेउपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंकेप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरेशिक्षणाधिकारी अश्विनी केळकर यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रभारी जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे म्हणालेअभियानाअंतर्गत प्रत्येक घरशाळाकार्यालयसंस्थाव्यापारी प्रतिष्ठाने यांनी ध्वज फडकवावा. देशभक्तीपर गीतध्वजसन्मान सोहळेनिबंधचित्रकला व घोषवाक्य स्पर्धा आयोजित कराव्यात. नागरिकांनी ध्वजासह छायाचित्रे/व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करावीत. ग्रामपंचायतनगरपालिकास्वयंसेवी संस्थामहाविद्यालये व सांस्कृतिक गटांचा सक्रिय सहभाग असावा. प्रभात फेरीसायकल रॅलीसांस्कृतिक कार्यक्रमदेशभक्तीपर प्रदर्शने आयोजित करावीत तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखण्याची सवय जोपासावी.

प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर प्रसारकार्य करावेअभियानातील उपक्रमांचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. शासकीय कार्यालयेधरणे व ऐतिहासिक स्थळांवर तिरंगा स्वरूपातील विद्युत रोषणाई करावीजेणेकरून नागरिकांना प्रेरणा मिळेल. तिरंगा ध्वज सहज उपलब्ध करून देऊन नागरिकांना सहभागासाठी प्रोत्साहित करावेअसेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीयस्वयंसेवी संस्था व नागरिकांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवून हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment