सोहळा दातृत्वाचा...
एक हात मदतीचा
Ø चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला अधिष्ठाता डॉ. कांबळे यांच्याकडून व्हीलचेअर
व स्ट्रेचर दान
चंद्रपूर, दि.
18 : कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व रुग्णालयात “सोहळा दातृत्वाचा... एक हात मदतीचा” हा अभिनव
उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे
यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक दायित्वाची जाणीव
अधोरेखित करण्यात आली.
या प्रसंगी
अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी एक लाख रुपये किमतीचे स्ट्रेचर व व्हिल चेअर
रुग्णालयासाठी दान केले. तर विकृतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व रक्तपेढी
प्रमुख डॉ. अमित प्रेमचंद यांनी 17 हजार
रुपये किमतीचे डोनर चेअर रक्तपेढीला प्रदान करून सामाजिक जाणिवेचे उदाहरण घालून
दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
अधिष्ठाता डॉ. कांबळे होते. विशेष अतिथी म्हणून माधुरी कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जिवने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित प्रेमचंद, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर
यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक, प्रशासकीय
अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी
मार्गदर्शन करताना डॉ. कांबळे म्हणाले, “प्रत्येकाने समाजाप्रती आपली जबाबदारी
ओळखून काहीतरी दान केले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने ‘Pay Back to Society’ ही भावना जोपासावी. वाढदिवसानिमित्त फुल न देता
एखादी वस्तू दान करून गरजूंना मदत करणे हेच खरे पुण्य आहे.”
कार्यक्रमात
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर, वैद्यकीय
अधीक्षक डॉ. जिवने, जन औषध विभागाचे प्रा. डॉ. अरुण हुमणे
तसेच दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाझारे यांनीही
दानधर्माचे महत्त्व अधोरेखित केले.
दान स्वरूपात मिळालेल्या साहित्याचे
हस्तांतरण अधिष्ठाता डॉ. कांबळे यांच्या हस्ते संबंधित विभागप्रमुख व कर्मचारी
यांच्याकडे करण्यात आले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक भास्कर झळके यांनी केले. संचालन समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे यांनी
तर आभार उमेश आडे यांनी मानले.
या उपक्रमासाठी समाजसेवा अधीक्षक
हेमंत भोयर, भूषण बारापात्रे, प्राजक्ता
पेठे, योगिता माळी, नवीन
उराडे तसेच नर्सिंग व तांत्रिक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
00000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment