Search This Blog

Monday, 11 August 2025

जिल्हा क्रीडा परिषदेची सभा संपन्न

 जिल्हा क्रीडा परिषदेची सभा संपन्न

             चंद्रपूरदि. 11:  जिल्हा क्रीडा परिषदचंद्रपूर ची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉनितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलीया बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंगअपर पोलिस अधिक्षक  श्वर कातखेडेशिक्षणाधिकारी राजेश पाताळेजिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व आमंत्रित सदस्य उपस्थित होते.

            क्रीडा व युवक सेवा संचालनालयअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि चंद्रपूर शहर महानगरपालिकायांच्या संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या सत्रात सुरु होणाऱ्या तालुकाजिल्हा व म..पा.स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजनाकरिता विस्तृत चर्चा करण्यात आलीया शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हयातील प्रत्येक शाळांनी सहभाग घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले.

           सन 2021-22 पासून क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याकरिता क्रीडा कार्यालयामार्फत dsochandrapur.co.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहेसन 2025-26  या सत्रात तालुकाजिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा सदर प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment