मूल आय.टी.आय. मध्ये मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकल या अभ्यासक्रमास मान्यता
चंद्रपूर, दि. 5 : मुल येथील मा.सां. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप अंतर्गत नव्या युगातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत मेकॅनिक इलेक्ट्रीक व्हेईकल हा अभ्यासक्रम प्रस्तावित होता. कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने आणि संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुंबई यांच्या पाठपुराव्याने राज्यातील अनेक संस्थांमध्ये न्यु एज कोर्सेस सूरू करण्यात येत आहेत.
त्यापैकी मुल येथील आय.टी.आय. मध्ये मेकॅनिक ईलेक्ट्रीक व्हेईकल या ट्रेडच्या दोन तुकड्यास प्रत्येकी 24 प्रशिक्षणार्थी क्षमता असलेल्या तुकड्यांना दिल्ली येथील डी.जी.टी. यांच्यामार्फत मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच संचलनालय, मुंबई यांच्या सुचनेनूसार प्रवेश वर्ष 2025 पासून या ट्रेड करीता ऑनलाईन पध्दतीने प्रवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.addmission.dvet.gov.in या संकेत स्थळावर जाऊन आपला प्रवेशाचा अर्ज अचुक भरावा. तसेच काही अडचण आल्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथील मार्गदर्शन केंद्रामध्ये थेट संपर्क करावा.
प्रवेशाच्या अटी व शर्ती : उमेदवार हा 12 वी पास, किंवा आयटीआय व 10 वा वर्ग पास, किंवा 10 वा वर्ग पास आणि 12 वि च्या शिक्षणा करीता NIOS (National Institute of Open School) मध्ये नोंदणीकृत असावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संस्थेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन मा.सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment