Search This Blog

Wednesday, 13 August 2025

अमृत आणि एमसीईडी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रम


अमृत आणि एमसीईडी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रम

             चंद्रपूरदि.13 : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे आणि उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत लक्षित गटातील उमेदवारांसाठी निःशुल्क प्रशिक्षण जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.

अमृत लक्षित गटातील युवक आणि युवतीसाठी अमृत-सुर्यमित्र (सौर)अमृत-बेकरीअमृत-आयात निर्यात आणि अमृत-निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण असे चार प्रकारचे प्रशिक्षण 18 दिवस निवासी होणर आहेत. त्याचबरोबर अमृत-उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (21 दिवस)अमृत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (30 दिवस) आणि अमृत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम (6 दिवस) हे तीन प्रकारचे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपात होणार आहेत.

सदरील ट्रेनिंगमध्ये तांत्रिक विषयाचे संपूर्ण प्रात्यक्षिक होणार असून सोबत उद्योजकीय मार्गदर्शनव्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिकव्यवस्थापकीय आणि कायदेशीर माहितीविपणन कौशल्यशासनाच्या विविध योजनाप्रकल्प अहवालउद्योकीय गुणसंपदा ई. विषयांवर तज्ञांमार्फत मार्गदर्शन होणार आहे. अमृत लक्षित गटातील किमान 8 वी पासकोणत्याही शासकीय कागदपत्रावर जातीचा उल्लेखतहसीलदार यांचा रहिवाशी आणि उत्पन्न दाखला ई. कागदपत्रे असणारे सर्व इच्छुक अर्ज करू शकतात.

तरी अमृत लक्षित गटातील इच्छुक उद्योजकांनी सदर प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रउद्योग भवनदूसरा मजलाबस स्टॅन्ड समोरचंद्रपूर येथे संपर्क साधावा किंवा संदीप जाने ९६३७५३६०४१ यांना संपर्क साधावाअसे आवाहन प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment