Search This Blog

Tuesday, 5 August 2025

सण उत्सव शांततेत पार पाडणे ही आपली सामुहिक जबाबदारी - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे



 

सण उत्सव शांततेत पार पाडणे ही आपली सामुहिक जबाबदारी प्रभारी जिल्हाधिकारी डॉव्यवहारे

Ø जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

चंद्रपूर, दि. 5 आगामी काळात जिल्ह्यात गणेशोत्सवश्रीकृष्ण जन्माष्टमीदहिहांडीपोळाईद – मिलाद असे सर्वधर्मीय सण-उत्सव साजरे होणार आहेहे सर्व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावेही आपली सर्वांचीच सामुहिक जबाबदारी आहेअसे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारे यांनी केले.

नियोजन सभागृह येथे जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होतेयावेळी अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडेमनपा आयुक्त विपीन पालीवालराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्यासहउपविभागीय पोलिस अधिकारीपोलिस निरीक्षकपोलिस पाटीलशांतता समितीचे सदस्यमहिला दक्षता समितीचे सदस्यगणेश मंडळाचे अध्यक्षमुर्तीकारडीजे चालक मालक आदी उपस्थित होते.

शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा’ दर्जा दिला आहेअसे सांगून डॉव्यवहारे म्हणाले, उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग नोंदवून बक्षीसे मिळवावीतगणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी घाट निश्चित करून विसर्जनस्थळी पूर्ण व्यवस्था करावीआरोग्य विभागाने प्रथमोपचार व्यवस्थाऔषधांची उपलब्धता चोख ठेवावी.

प्रादेशिक परिवहन विभागाने मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष द्यावेगणेशोत्सवात वीज पुरवठा खंडीत होणार नाहीतसेच मंडळांना वीज जोडणी महावितरण कंपनीने उपलब्ध करून द्यावीसार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे असलेल्या रस्त्यांची डागडुजी करावीअन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाईअन्न पदार्थांची तपासणी करावीअशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉव्यवहारे यांनी दिल्या.

डीजे मुक्त गणेशोत्सवसाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा : अपर पोलिस अधिक्षक कातकडे

प्रशासन म्हणजे केवळ शासकीय विभागच नव्हे तर आपण सर्वजण म्हणजे प्रशासन होयत्यामुळे जिल्हा प्रशासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहेउत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पर्यावरणपुरक गणेशोत्सवरक्तदान शिबीरप्लॅस्टिक निर्मुलनवृक्षारोपणगरीब शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावातसेच डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावाअसे आवाहन अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी केले.

पुढे ते म्हणालेडीजे ऐवजी लेझीम नृत्यढोल ताशे असे पारंपरिक वाद्ये वाजवावीतगणेश मंडळांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावाजेणेकरून गर्दीला आळा घालता येईलतसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहेअफवांवर विश्वास ठेवू नकाअफवा लक्षात येताच तात्काळ पोलिसांशी संपर्क कराअसे त्यांनी सांगितले.

शांतता समिती सदस्यांच्या सुचना : 1. सण उत्सवाच्या दरम्यान विद्युत पुरवठा अखंडीत सुरू राहावा, 2. डीजे चा आवाज मर्यादीत असावा, 3. मिरवणुकीसाठी रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी, 4. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, 5. अफवा पसरणार नाहीयाची दक्षता घ्यावी, 6. मुर्तीची उंची मर्यादेपेक्षा जास्त असू नये, 7. मिरवणुकीदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर ध्वनीक्षेपक बंद ठेवावे, 8. मुर्ती विक्री चांदा क्लब ग्राऊंडवरच व्हावी, 9. लेझर लाईटवर बंदी आणावी, 10. सजावटीमध्ये प्लॅस्टिकथर्माकॉलच्या वापरावर प्रतिबंध करावे.

००००००००

No comments:

Post a Comment