Search This Blog

Wednesday, 27 August 2025

चंद्रपूरमध्ये श्री. गणेश आरोग्य अभियानांतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरे


 चंद्रपूरमध्ये श्री. गणेश आरोग्य अभियानांतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरे

Ø 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान प्रमुख गणेश मंडळांमध्ये आयोजन

चंद्रपूरदि. 27 : श्री. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने "श्री गणेश आरोग्य अभियान" अंतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी ही शिबिरे भरविण्यात येणार आहेत.

या शिबिरांमधून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीवैद्यकीय सल्लाआयुष्यमान कार्ड काढणे तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळणार आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला डॉ. हेमचंद कन्नाके (निवासी वैद्यकीय अधिकारी)डॉ. निवृत्ती जिवने (वैद्यकीय अधीक्षकशासकीय वैद्यकीय महाविद्यालय)डॉ. मौहनिश गिरी (जिल्हा आरोग्य विभाग)डॉ. भूषण जैन (जिल्हा समन्वयकमुख्यमंत्री सहाय्यता निधी)डॉ. रुपेश कुमारवार (क्षेत्रीय व्यवस्थापक)डॉ. इंद्रजीत किल्लेदार (जिल्हा समन्वयकमहात्मा जोतीबा फुले जन व आयुष्यमान भारत योजना)डॉ. कविश्वरी कुंभलकर (अध्यक्षमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष) यांसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक मंडपांना भेट देतात. त्यामुळे थेट लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहेअसे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे यांनी सांगितले.

शिबिरांत सहभागी गणेश मंडळे :

* चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ

* जोड देऊळ गणेश मंडळपठाणपुराचंद्रपूर

* रेणुका माता गणेश मंडळभानापेठचंद्रपूर

* युवक गणेश मंडळगंजवार्डचंद्रपूर

* श्री हिवरपुरी सर्वोदय सार्वजनिक गणेश मंडळचंद्रपूर

* जय हिंद गणेश मंडळबालाजी वॉर्डचंद्रपूर

शिबिरांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपले आधारकार्ड तसेच शासकीय आरोग्य योजनांशी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीतअसे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावेळी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामुख्यमंत्री आरोग्य योजना आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे.

000000

No comments:

Post a Comment