Search This Blog

Monday, 18 August 2025

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

 


जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 18 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर एस. एस. इंगळे, मुख्य न्यायदंडाधीकारी पी. पी. कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक (वाहतूक शाखा) कोमल सुर्यवंशी, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक पवन गुज्जर आदींनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना विविध काय‌द्याबाबतचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार अॅड. महेंद्र असरेट यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment