Search This Blog

Thursday, 28 August 2025

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिष्यवृत्ती

 

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिष्यवृत्ती

सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

चंद्रपूरदि. 28 : सन 2025-26 मध्ये अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर, पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत चालू शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्यांकडून 18 जुलै 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहेसदर जाहिरातीस मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर 2025 आहेसदर अर्ज आयुक्तसमाजकल्याण, 3, चर्च पथपुणे – 01 यांच्या कार्यालयात सादर करावयाची असल्याचे सहायक आयुक्तविनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment