Search This Blog

Tuesday, 26 August 2025

स्क्रब टायफसबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

 

स्क्रब टायफसबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 26 : किटकजन्य आजारातील स्क्रब टायफस हा जिवाणूंमु‌ळे होणारा व माइट्सद्वारा प्रसारीत होणारा आजार आहेज्याला बुश टायफस असेही म्हणतात. ओरिएंटिया सुत्सुगामुशी हा जिवाणूसंक्रमित चिगार (माइट्सच्या अळ्याद्वारे प्रसारित होतोपावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आले आहेतस्क्रब टायफस या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अधिक सतर्क राहून सर्व प्रकारच्या उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहेअसे  आवाहनआरोग्य विभागाने केले आहे.

संक्रमण : संक्रमित चिगर (माइट्सची अळी माणसाला चावताच जिवाणू रक्त प्रवाहात प्रवेश करतात आणि पुनरुत्पादन करण्यास सुरवात होते. ज्यानंतर स्क्रब टायफस आजाराची लक्षणे दिसू लागतात.

जोखमीचे घटक : शेतात काम करणारे व जंगलात काम करणारे मजूरगावाच्या टोकाला राहणारेतोकडे कपडे घालणारे व्यक्तीपायात जोडे व हातमोजे न घालता काम करणारे व्यक्तीरोगप्रतिकारक शक्ती कमी असेलेल्या व्यक्ती इत्यादी.

स्क्रब टायफसची लक्षणे : स्क्रब टायफसची लक्षणे चिगर चावल्यानंतर 6 ते 21 दिवसांच्या आत दिसून येतातप्रभावी उपचारांसाठी लवकर निदान महत्वाचे आहेउपचार न केल्यास स्क्रब टायफसमुळे अधिक गंभीर लक्षणे दिसू शकतात. सर्वसाधारणतः डोकेदुखीथंडी वाजुन तीव्र ताप येणेमळमळशरीरात कंपण सुटणेलसिका ग्रंथीमध्ये सुजसांधेदुखीकोरडा खोकलानिमोनिया सदृश्य आजारचिगर चावल्याने खाज येणेअंगावर चट्टे येणेचिगारदंश झालेल्या ठिकाणी जखम होऊन खिपली येणे इत्यादी.

स्क्रब टायफसचे निदान : स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी रक्त जल तपासणी करण्यात येतेसदर तपासणीची सोय वैद्यकिय महाविद्यालयात उपलब्ध आहेप्रभावी उपचारांसाठी अचूक आणि वेळेवर निदान महत्त्वाचे आहेरुग्णांचे चिन्हबाहय लक्षणांवरून आणि रुग्णाच्या वास्तव्य इतिहासाची तपासणी केली जातेचिगर चाव्याच्या ठिकाणी व्रण असणे एक महत्वपूर्ण लक्षण आहे.

उपचार : स्क्रब टायफसचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहेप्रतिजैविके (Antibiotics) थेरेपी हा उपचाराचा आधारस्तंभ आहेयाकरिता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. रुग्णास येणारा अचानक तापशरीरातील कमी होणारी पाण्याची मात्रा यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहेउपचार न केल्यास किंवा उपचारास उशीर झाल्यास स्क्रब टायफसमुळे गंभीर गुतागुंत होऊ शकते, ज्यापैकी काही जीवघेणी असू शकतात.

नियंत्रण : स्क्रब टायफस चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंध करणे महत्वाचे आहेनिवासी क्षेत्राभोवती झाडे झुडपे नियमितपणे साफ करणेउंदिर हे ओरिएंटिया सुत्सुगामुशी साठीचे वाहक असून उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना : 1. स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यास किंवा ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे 2. पूर्ण बाहयांचे व शरीर पुर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत 3. घरात पाळलेल्या पाळीव प्राण्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी 4. घराचे आजुबाजुला वाढलेली अतिरिक्त झाडे झुडपे काढुन टाकावीत 5. शेतात व जंगलात काम करणारे मजुर यांनी पायात जोडे व हातमोजे घालावेत 6. कपडे बदलतांना किटक नसल्याची खात्री करावी 7. कपडे झटकुन घालावे 8. शेतात जंगलात काम करुन आल्यावर कपडे गरम पण्यात भिजवावेत 9. आवश्यकते नुसार परिसरात तन नाशककिटकनाशकाची फवारणी करावी 10. उंदिर नियंञण कार्यवाही करावी.

जनतेस आवाहन : वरीलप्रमाणे नमुद लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ वैद्यकिय सल्ला घेणे व उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहेनागरिकांनी सतर्क राहून लवकर निदानवेळेत उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार पूर्णपणे टाळता आणि नियंत्रित करता येऊ शकतोअसे जिल्हा हिवताप अधिकारी डॉप्रकाश साठे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment