वीर परिवार सहायता योजनेअंतर्गत विधी चिकित्सालयाची स्थापना
चंद्रपूर, दि. 13 : राष्ट्रीय विधी सेवा प्रधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्रधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यात वीर परिवार सहायता योजना 2025 समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समिती अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे विधी चिकित्सालय स्थापन करण्यात आले आहे. सदर विधी चिकित्सालयामार्फत संरक्षण दलातील आजी /माजी कर्मचारी व त्यांचे आश्रित कुटुंबीयांना मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय चंद्रपूर येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी आणि मार्गदर्शन मिळविण्याकरीता संरक्षण दलातील आजी /माजी कर्मचारी व त्यांच्या आश्रित कुटुंबियांनी उपस्थित राहावे. जेणेकरून त्यांना कायदेशीर येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याबाबत माहिती मिळेल, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment