Search This Blog

Tuesday, 26 August 2025

निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द


निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द

Ø जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - 2025

चंद्रपूरदि. 26 : चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागासाठी निवडायची सभासद संख्या निश्चित करण्यात आली आहेत्यानुसार निवडणूक विभाग 56 व निर्वाचक गणाची प्रभाग रचना 112 आहे.

निश्चित केलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे अंतिम परिशिष्ट 8 (व 8 (मधील अधिसुचना व अनुसूची तयार करून ती शासन राजपत्रात 22 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयतहसील कार्यालयजिल्हा परिषद कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयातील सुचना फलक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरीता निवडायची सदस्य संख्या : चिमूर (जि.. – 5 सदस्यपं.. – 10 सदस्य), नागभीड (जि.. – 4, पं.. - 8), ब्रम्हपुरी (जि.. – 5, पं.. - 10), सिंदेवाही (जि.. – 4, पं.. - 8), भद्रावती (जि.. – 4, पं.. - 8), वरोरा (जि.. – 5, पं.. - 10), चंद्रपूर (जि.. – 5, पं.. - 10), मुल (जि.. – 3, पं.. - 6), सावली (जि.. – 4, पं.. - 8), पोंभुर्णा (जि.. – 2, पं.. - 4), गोंडपिपरी (जि.. – 3, पं.. - 6), बल्लारपूर (जि.. – 2, पं.. - 4), कोरपना (जि.. – 4, पं.. - 8), जीवती (जि.. – 2, पं.. - 4) आणि राजुरा (जि.. – 4, पं.. - 8).

००००००

No comments:

Post a Comment