Search This Blog

Friday, 29 August 2025

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू

Ø थांबविलेले लाभ पुर्ववत करण्यासाठी मोहीम  

Ø यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 29 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहेशासनाकडून जिल्हास्तरावर या योजनेच्या लाभार्थींचे वय पडताळणी यादी व एका परिवारातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी यादी प्राप्त झाली आहे.

त्याअनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्यामार्फत अंगणवाडी सेविकामदतनीस व पर्यवेक्षिका यांच्याकडून लाभार्थींचे पडताळणीचे कार्य सुरू आहेया पडताळणीकरिता यंत्रणेस सहकार्य करावेजेणेकरून लाभार्थीचे शासन स्तरावरून थांबविलेले लाभ पूर्ववत सुरू करता येईलअधिक माहिती करिता तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मेयांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment