चंद्रपूर बाधितांची संख्या 133 वर
आतापर्यत 79 कोरोनातून बरे ; 54 बाधितांवर उपचार सुरू
Ø जिल्ह्यात आतापर्यंत 85 हजारावर नागरिक दाखल
Ø संस्थात्मक अलगीकरणात 998 नागरिक
Ø आतापर्यंत 83 हजारावर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण
चंद्रपूर,दि.8 जुलै: जिल्ह्यात आज आणखी 5 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन जवानांसह 128 झालेली सोमवारी रात्रीची संख्या बुधवारी 133 वर पोहोचली आहे. मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह आढळला नव्हता.
जिल्हा आरोग्य यंत्रणेनेने दिलेल्या माहितीनुसार आज पुढे आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाचा समावेश आहे. कोल्हापूर पोलीस कंपनीच्या या 32 वर्षीय जवानाचा 6 तारखेला स्वॅब घेण्यात आला होता. 8 तारखेला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यामुळे आतापर्यत राज्य राखीव पोलीस दलाच्या चवथ्या जवानाला कोरोनाची चंद्रपूरमध्ये लागन झाली आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 129 बाधित अधिक 4 बाहेरील बाधित अशी संख्या 133 झाली आहे.
ऊर्जानगर मधील त्यापूर्वी आढळलेल्या एका बाधितांच्या संपर्कातील एकूण तीन जण पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये बाधितांची 60 वर्षीय आई व सात वर्षीय नात यांच्यासोबतच या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या 31 वर्षीय व्यक्तीचा देखील समावेश आहे.
आजच्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये वरोरा तालुक्यातील मोहबाळा येथील 38 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. नागपूर येथून आल्यानंतर हा व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात न राहता एक दिवसासाठी घरी गेला होता. नंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांचा स्वॅब घेतला असता ते पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह बाधितांची संख्या 133 झाली आहे. आत्तापर्यंत 79 बाधित कोरोना आजारातून बरे झाले असून 54 संक्रमितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 7 हजार 364 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 133 नमुने पॉझिटिव्ह, 6 हजार 65 नमुने निगेटिव्ह, 1 हजार 146 नमुने प्रतीक्षेत तर 20 नमुने अनिर्णीत आहेत.
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 998 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 182 नागरिक,तालुकास्तरावर 408 नागरिक तर, जिल्हास्तरावर 408 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 85 हजार 586 नागरिक दाखल झाले आहेत. 83 हजार 468 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 2 हजार 295 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-16, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा तीन, सिंदेवाही दोन, मुल चार, ब्रह्मपुरी 22, नागभीड चार, वरोरा पाच, कोरपना तीन, गोंडपिपरी एक, चिमूर एक बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर चार, वरोरा 11, राजुरा तीन, मुल एक, भद्रावती चार, ब्रह्मपुरी-13, कोरपणा, नागभिड, गडचांदूर प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ चार, बालाजी वार्ड दोन, भिवापूर वार्ड दोन , शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, लुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक, तुकूम तलाव दोन, दूध डेअरी तुकूम दोन, लालपेठ एक, पोलीस मंगल कार्यालय तुकूम चार बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 133 वर गेली आहे.
कोविड-19 संक्रमित 133 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील देशनिहाय, राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. साऊथ आफ्रिका एक, कजाकिस्तान एक, दिल्ली -8, हरियाणा (गुडगाव) दोन, ओडीसा एक, तेलंगाना दोन, गुजरात चार, हैद्राबाद-13, नागपूर 6, अकोला दोन, वाशिम एक, मुंबई-16, ठाणे तीन , पुणे-9, नाशिक चार, जळगांव एक, यवतमाळ -6, औरंगाबाद चार, कोल्हापूर एक, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-9, संपर्कातील व्यक्ती -39 आहेत.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ) आणि 8 जुलै ( एकूण पाच बाधित ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 133 झाले आहेत. आतापर्यत 79 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 133 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 54 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
000000

No comments:
Post a Comment