Search This Blog

Wednesday, 30 April 2025

विशेष लेख भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव

 



विशेष लेख

भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव

भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावर

WAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा

 

 नवी दिल्ली 30 : 19 जानेवारी 2019 रोजी मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रेरणादायी स्वप्न मांडले ते म्हणजे आपण एका परिषदेपासून सुरुवात करू आणि तिला डाव्होसच्या धर्तीवर  जागतिक परिषद बनवू. या दृष्टिकोनाला साकार करणारा एक भव्य उपक्रम म्हणजे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025.

भारताची सांस्कृतिक आणि मनोरंजनाची राजधानी, मुंबई  1 ते 4 मे 2025 दरम्यान या अभूतपूर्व जागतिक सोहळ्याचे यजमानपद भूषवणार आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या सहकार्याने हा सोहळा  मुंबईत आयोजित केला आहे. WAVES 2025 हे भारताला जागतिक कंटेंट हब म्हणून स्थापित करण्याचे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जिथे सर्जनशीलता, नवप्रवर्तन आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा एकत्र येणार आहे.   जगात प्रथमच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे."

कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज या ब्रिदवाक्यासह, WAVES 2025 ही भारतातील पहिली जागतिक मीडिया आणि मनोरंजन परिषद आहे, जी मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलातील  जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजनासाठी  सज्ज  झाले आहे. हा चार दिवसांचा महोत्सव भारताच्या 54 अब्ज अमेरिकी डॉलरच्या (2026 पर्यंत) मीडिया आणि मनोरंजन बाजारपेठेला नव्या उंचीवर नेण्यासाठी आकारला गेला आहे. या परिषदेत भारताच्या कथाकथन परंपरेला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अॅनिमेशन, VFX, गेमिंग, AR/VR/XR, कॉमिक्स, चित्रपट, माहितीपट, सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म आणि प्रसारण यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांशी जोडले जातील. ही परिषद केवळ एक इव्हेंट नाही, तर सर्जनशीलतेचा महासागर आणि नवप्रवर्तनाची लाट आहे, जी भारताला जागतिक सर्जनशील केंद्र बनवण्यासाठी सज्ज झाले आहे. 

WAVES 2025 मध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 40 जागतिक मंत्री आणि नेटफ्लिक्स, गुगल, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, सोनी पिक्चर्स, अॅडोब, एपिक गेम्स यासारख्या दिग्गज कंपन्या सहभागी होतील. जागतिक बॉलिवूडचे वरिष्ठ  कलाकार शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, चिरंजीवी, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि दिलजीत दोसांज यांच्या सल्लागार मंडळाने या परिषदेला पाठिंबा दिला आहे. नेटफ्लिक्सचे टेड सरांडोस, अॅमेझॉनचे माइक हॉपकिन्स आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती WAVES परिषदेला जागतिक स्तरावर ओळख देईल. या परिषदेचा मुख्य उद्देश भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे आणि नवप्रवर्तनाला गती देणे आहे. भारत आणि इतर देशांमधील सर्जनशील उद्योगांमधील भागीदारी वाढवणे, AI आणि गेमिंगसारख्या तंत्रज्ञानांचा वापर करून उद्योगाला नवे आयाम देणे आणि 2027 पर्यंत 36.1 अब्ज डॉलरची सर्जनशील अर्थव्यवस्था उभारणे हा या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. यामुळे 2–3 लाख रोजगार निर्माणही होतील, सोबतच महिला-नेतृत्वातील स्टार्टअप्स आणि 12–19 वयोगटातील क्रिएटर्सना प्राधान्य देऊन त्यांचा  समावेशकता वाढेल. 

  

WAVES 2025 परिषदेला 1 मे रोजी भव्य सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन,

चार दिवस AI, मीडिया आणि संस्कृतीच्या महोत्सवाने सजणार

 

WAVES 2025 या बहुप्रतीक्षित महोत्सवाचा प्रारंभ परिषदेच्या पहिल्या दिवशी 1 मे 2025 रोजी भव्य उद्घाटन समारंभाने होणार असून, या सोहळ्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. या वेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. ग्लोबल मीडिया डायलॉग्समध्ये मंत्र्यांसह धोरणे, गुंतवणूक आणि सहकार्यासाठी चर्चा होतील . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत PM-CEO राउंडटेबल आयोजित  होतील, ज्यामध्ये उद्योगांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण संवाद होतील. भारत पॅव्हिलियनच्या लाँचद्वारे नाट्यशास्त्रापासून AI-चालित कथांपर्यंतचा भारताचा कथाकथन वारसा प्रदर्शित होईल. एक्झिबिशन आणि गेमिंग अरेनामध्ये AI, AR/VR/XR, VFX मधील नवकल्पना दिसतील. WAVES बाजार क्रिएटर्स, स्टुडिओ आणि खरेदीदारांसाठी नेटवर्किंगची संधी या आतंरराष्ट्रीय व्यासपीठावर  एक छताखाली उपलब्ध होतील, तर शास्त्रीय आणि फ्यूजन कॉन्सर्ट्ससह सांस्कृतिक कार्यक्रम या दिवसाला अविस्मरणीय बनवतील.   

दुसऱ्या दिवशी, 2 मे 2025 रोजी, क्रिएटोस्फीअरमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा थेट अंतिम सोहळा होईल, ज्यामध्ये 32 स्पर्धांमधी 750 फायनलिस्ट सहभागी होतील. यामध्ये फिल्म पोस्टर मेकिंग, यंग फिल्ममेकर्स, बॅटल ऑफ द बँड्स यासारख्या स्पर्धांचा समावेश असेल. नेटफ्लिक्स आणि सोनी पिक्चर्स यांचे मास्टरक्लासेस सर्जनशीलतेला प्रेरणा देतील. WAVES क्रिएटर अवॉर्ड्समध्ये अॅनिमेशन, गेमिंग आणि AI मधील विजेत्यांचा गौरव करण्यात येईल. वेव्हएक्सलरेटर स्टार्टअप्ससाठी पिचिंग आणि मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होईल, तर थॉट लीडर्स ट्रॅकमध्ये जेनरेटिव्ह AI आणि इमर्सिव्ह स्टोरीटेलिंगवर चर्चा होईल. WAVES बाजारात सह-निर्मिती आणि कंटेंट खरेदीसाठी B2B बैठका होतील, ज्या क्रिएटर्स आणि उद्योग दिग्गजांना एकत्र आणतील. 

तिसऱ्या दिवशी, 3 मे 2025 रोजी, ग्लोबल मीडिय डायलॉग्स WAVES डिक्लरेशन 2025 च्या समारोपासह चर्चा करतील. वेव्हएक्सलरेटर गेमिंग, AI आणि मेटाव्हर्स स्टार्टअप्ससाठी पिचिंग आणि गुंतवणूक आणेल. क्रिएटोस्फीअरमध्ये XR हॅकाथॉन, AI अवतार चॅलेंज आणि अॅनिमेशन स्पर्धा झोन उपलब्ध असेल. प्रदर्शनात  भारतीय IPs आणि AR/VR/XR तंत्रज्ञान प्रदर्शित होतील. WAVES बाजार जागतिक निर्माते आणि प्रसारकांमधील जुळवणी सुलभ करेल, ज्यामुळे सह-निर्मिती आणि IP खरेदीला चालना मिळेल. 

चौथ्या आणि अंतिम दिवशी, 4 मे 2025 रोजी, समारोप समारंभात WAVES च्या प्रभावाचा आढावा घेतला जाईल आणि भविष्य आवृत्त्यांची घोषणा होईल. क्रिएटोस्फीअरमध्ये क्रिएट इन इंडिया चॅलेंज विजेत्यांचे प्रदर्शन आणि WAVES अवॉर्ड्स आयोजित केले गेले आहे. वेव्हएक्सलरेटर स्टार्टअप इंडिया अंतर्गत अनुदानाच्या घोषणा होतील, तर भारत पॅव्हिलियन भारताच्या 50 अब्ज+ अमेरिकी डॉलर M&E क्षमतेचा उत्सव साजरा करेल. हा दिवस WAVES च्या यशाचा  मैलाचा दगड ठरेल आणि भारताच्या सर्जनशील भविष्याची दिशा ठरवेल. 

WAVES 2025 परिषदेची ची विशेष वैशिष्ट्ये भारत पॅव्हिलियनपासून सुरू झाली, जे बॉलीवूड, प्रादेशिक सिनेमा, OTT आणि गेमिंगमधील नवकल्पना दाखवेल. WAVES बाजार हे कंटेंट क्रिएटर्स, खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी जागतिक ई-मार्केटप्लेस असेल, जिथे सह-निर्मिती आणि IP खरेदी सुलभ होईल. वेव्हएक्सलरेटर गेम स्टुडिओ आणि लॅपविंग स्टुडिओ यासारख्या स्टार्टअप्सना पिचिंग, इनक्यूबेशन आणि अनुदानाद्वारे सक्षम करेल. क्रिएटोस्फीअर 100+ देशांमधील 750 फायनलिस्टसह क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा अंतिम सोहळा साजरा करेल, तर ग्लोबल मीडिय डायलॉग्स आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी व्यासपीठ  प्रदान करेल. 

क्रिएट इन इंडिया चॅलेंज (CIC) सिझन 1 ही WAVES ची आत्मा आहे. 32 स्पर्धांमधील प्रतिभांना प्रोत्साहन देणारी ही चळवळ 1 लाख नोंदणी आणि 100+ देशांमधील 1,100 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह जागतिक स्तरावर गाजत आहे. फिल्म पोस्टर मेकिंग, यंग फिल्ममेकर्स, WAVES VFX, गेम जेम्स, XR हॅकाथॉन, बॅटल ऑफ द बँड्स आणि मंगा कॉन्टेस्ट यासारख्या स्पर्धांमधून सर्जनशीलतेला  जागतिक ओळख, पुरस्कार आणि नेटवर्किंगच्या  सुवर्ण संधी उपलब्ध होतील. 

WAVES 2025 ही केवळ एक परिषद नाही, तर भारताच्या सांस्कृतिक आणि तांत्रिक क्षमतेचा जागतिक महोत्सव आहे. डाव्होस आणि कान्स यांसारख्या परिषदांप्रमाणे, WAVES जागतिक सर्जनशील उद्योगासाठी एक सर्वोत्तम व्यासपीठ बनेल. यामुळे भारताला सर्जनशील उद्योगाचे जागतिक केंद्र बनवताना IP संरक्षण, 2–3 लाख रोजगार आणि जागतिक व्यापार सुनिश्चित  होऊ शकेल. या ऐतिहासिक WAVES 2025 च्या जागतिक परिषदेत  सामील व्हा आणि जागतिक सर्जनशीलतेच्या क्रांतीचे साक्षीदार व्हा!

  

0000000

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचा संकल्प करा - पालकमंत्री डॉ. अशोक उईके




 

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचा संकल्प करा पालकमंत्री डॉअशोक उईके

Ø शिक्षण विभागाचा आढावाविद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा 

चंद्रपूरदि. 30 एप्रिल : विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार्थी कसा समोर जाईल, याचा गांभिर्याने विचार करून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे. आजच्या युगात इंग्रजी शाळांचे प्रस्त वाढले असतांनाजिल्हा परिषदेच्या शाळेतसुध्दा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उज्वल भविष्य मिळू शकतेअसा विश्वास पालकांना देऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी संकल्प करावाअशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे (माध्य.), अधिष्ठाता डॉमिलिंद कांबळेजिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

शाळेतील मूलभूत सुविधांसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाहीअसे सांगून पालकमंत्री डॉउईके म्हणालेजि.शाळांतील विद्यार्थी पटसंख्या का कमी होत आहेयाची कारणमिमांसा होणे आवश्यक आहेया कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने पाऊले टाकावीत. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यांच्या पाल्यांची गुणवत्ता आणि उज्वल भविष्य आम्ही घडू शकतो, असा विश्वास पालकांना द्या. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या असर आणि नॅस’ या उपक्रमांचा आधार घेऊन शिक्षण विभागाने प्रयत्न करावे.

शाळेमध्ये शिक्षकांची समिती तयार करून अध्यापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची शिक्षकांकडूनच पडताळणी करा. नवनवीन संशोधन करा. आगामी शैक्षणिक क्षेत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होण्यासाठी आतापासून नियोजन करा. शैक्षणिक उपक्रमांतर्गत दर 15 दिवसांनी पालकांच्या उपस्थितीत दर्जेदार चावडी वाचन उपक्रम राबवाज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन आणि विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो, त्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी देण्यात येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याचा त्रास होऊ नयेयासाठी मानव विकास अंतर्गत बसेसचे योग्य नियोजन करा.

गाव स्तरावरील शाळांना भेटी द्या : शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी गाव स्तरावरील शाळांमध्ये भेटी देऊन नियमितपणे आढावा घ्यावा. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे, ते खरंच सुरू आहेत काशाळेतील तक्रार पेटींचा उपयोग होतो का, याची पडताळणी करावी. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवाअशा सुचना पालकमंत्री डॉउईके यांनी दिल्या.

मानव विकास अंतर्गत 7445 विद्यार्थीनींना सायकलचे वाटप : चंद्रपूर जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या एकूण 2461 शाळा असून यापैकी 1549 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेतजिल्ह्यात एकूण विद्यार्थी संख्या लक्ष 61 हजार 687 आहेसखी सावित्री समितीविद्यार्थी सुरक्षा समिती आणि तक्रार पेटी उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या 2461 आहे. 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या 549 शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहेतसेच जिल्ह्यात अपार आयडीचे काम 87 टक्के पूर्ण झाले आहेमानव विकास अंतर्गत ग्रामीण भागातील 7445 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने बैठकीत दिली.

०००००००

Tuesday, 29 April 2025

' वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ



 ' वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

 

मुंबई, दि. 28 : देशातील माध्यम व मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या वेव्हज 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. 1 मे रोजीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. 1 ते 4 मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असूनमाध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

 मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे २०२५ या कालावधीत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकरकेंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही या परिषदेत सहभाग असणार आहे. 

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. विशेषतः मुंबईला हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हटले जाते. मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई देशात अग्रगण्य शहर आहे. गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीतही आघाडीवर आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात देखील महाराष्ट्र आणि मुंबई आघाडीवर राहिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देखील महाराष्ट्र या देशाच्या पातळीवर अन्य देशांशी स्पर्धा करतो आहे. म्हणून पर्यटनाची सगळी स्थळे जागतिक पातळीवर जावीहा देखील या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचा उद्देश आहे. या कार्यक्रमात ३३ देशांतील मंत्री व मंत्रीस्तरीय अधिकारीतसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूडटॉलीवूडमराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्मातेही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

या चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियनमहाराष्ट्र पॅव्हेलियनतेलंगणा पॅव्हेलियन तसेच अन्य  संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. त्यांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे 2025 रोजी करणार आहेत. विविध क्षेत्रांतील परिसंवादराउंड टेबल कॉन्फरन्सआणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. विशेषतः तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ मे २०२५ रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र – ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमीकडे वाटचाल

बॉलीवूडटीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर 'क्रिएटर हबम्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न वेव्हज 2025’ च्या माध्यमातून होतो आहे. ऑस्करकान्स आणि दावोससारख्या जागतिक परिषदेच्या धर्तीवर प्रथमच भारतात अशी परिषद आयोजित होत असूनजगभरातील 100 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला दिशा देणारा मंच

वेव्हज 2025’ ही परिषद केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक माध्यम व मनोरंजन (M&E)  उद्योगाला एकत्र आणणारानवसृजनास चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्त्वाचा मंच आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसातंत्रज्ञानातील कौशल्य आणि प्रतिभेचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे.

परिषदेतील एक विशेष आकर्षण 'WAVES बाजार

 ‘WAVES बाजार’ – एक इंटरॅक्टिव्ह व्यावसायिक व्यासपीठ असून जिथे खरेदीदार आणि विक्रेते थेट संवाद साधू शकतात. नव्या प्रकल्पांची ओळखसर्जनशील कल्पनाआणि गुंतवणुकीच्या संधी येथे उपलब्ध होतील. विशेषतःश्रेणीआधारित शोध प्रणाली आणि सुरक्षित मेसेजिंग सुविधांमुळे व्यवहार अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरतील.

परिषदेत काय असणार?

·         परिषद सत्रे – जागतिक उद्योग नेतेविचारवंत आणि नवोन्मेषक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

·         मीडिया मार्केटप्लेस – भारताच्या माध्यम व मनोरंजन (M&E) क्षेत्रातील वैविध्यक्षमता आणि नवकल्पनांचे आकर्षक प्रदर्शन.

·         तंत्रज्ञान प्रदर्शन – नवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रकल्पांचे लाईव्ह डेमो.

·         सांस्कृतिक कार्यक्रम – भारताच्या समृद्ध कलासंपदेची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम.

जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025’ भारताला जागतिक पातळीवर कंटेंट सुपरपॉवर’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबईने क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे. ‘वेव्हज 2025’ ही केवळ एक शिखर परिषद नाहीतर भारताच्या सर्जनशील शक्तीलाजागतिक गुंतवणुकीला आणि धोरणात्मक बदलांना चालना देणारा परिवर्तनशील क्षण आहे. भारताने याचा उपयोग करून जागतिक कंटेंट क्षेत्रावर आपला ठसा उमटवावाअशी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

वेव्हज 2025’ का आहे ही परिषद खास?

भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन (Media & Entertainment - M&E) उद्योग हा वेगाने प्रगत होत असलेला आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. OTT, अ‍ॅनिमेशनगेमिंग, VFX, चित्रपटसंगीतआणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताने गेल्या दशकात विक्रमी प्रगती केली आहे. FICCI-EY रिपोर्टनुसार, 2024 मध्ये भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाची किंमत $28 अब्जच्या पुढे गेली असून, 2025 पर्यंत तो $34 अब्ज गाठेल असा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वेव्हज 2025’ ही परिषद केवळ चर्चासत्रांचे व्यासपीठ नसूनभारतातील सृजनशील उद्योगक्षेत्राला जगभरातील गुंतवणूकसहकार्यआणि नवकल्पनांशी जोडणारा सेतू ठरणार आहे. 

भारत – सृजनशील महासत्ता होण्याच्या वाटेवर

भारतात सध्या दरवर्षी 2,000 पेक्षा अधिक चित्रपट तयार होतातज्यात 20 पेक्षा अधिक प्रादेशिक भाषा समाविष्ट असतात. OTT प्लॅटफॉर्मवर भारतीय कंटेंटची मागणी केवळ देशातच नव्हे तर अमेरिकायुरोपमिडल ईस्ट आणि दक्षिण आशियाई देशांमध्येही वाढत आहे. या मागणीचा फायदा घेतभारताने कंटेंट एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे. WAVES 2025 या दिशेने एक निर्णायक टप्पा ठरेल. ही परिषद केवळ संवादाचा नव्हेतर कृतीशील धोरणनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरेलजिथून भारताची माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भविष्यातील दिशा ठरवली जाईल. 

ऑस्करकान्सवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदावोसच्या धर्तीवर वेव्हज् चेही दरवर्षी आयोजन

‘वेव्हज्’ ही परिषद केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने होत आहे. वेव्हजला कायमस्वरूपी एक सचिवालय स्वरूपात पुढे नेण्यात येणार आहे. या परिषदेस एक कायमस्वरूप देऊन दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. ज्याप्रमाणे ऑस्करकान्स किंवा दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जातेअगदी त्याचप्रमाणे वेव्हज याचेही दरवर्षी आयोजन केले जाणार आहे. यासाठी एक समर्पित टीम वर्षभर काम करणार आहे. 

वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश होणार सहभागी

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ते बदलणारे आहे. या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावेयावर जोर देण्यात येत आहे. दृकश्राव्य तसेच मनोरंजन क्षेत्रात क्रियेटिव्ह इॅकॉनॉमीला एक प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या जी 20 पेक्षा खूप मोठा असणार आहे.

वेव्हज समिटची वैशिष्ट्ये आणि महत्त्वाचे घटक:

• 'क्रिएट इन इंडियावर भर: मेक इन इंडियापाठोपाठ आता 'क्रिएट इन इंडियाही नवी संकल्पना  WAVES समिटद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे नेली जाईल.

• सर्जनशील प्रतिभेला व्यासपीठ: भारतातील प्रादेशिक भाषांतील कंटेंटअ‍ॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील नवोदित निर्माते आणि कलाकारांना जागतिक प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर करण्याची संधी.

• ग्लोबल सहयोग आणि भागीदारी: Netflix, Amazon, Disney+, Sony Pictures यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारीसाठी मार्ग मोकळे होतील.

• तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा संगम: एआयवर्च्युअल प्रोडक्शनआणि इंटरॅक्टिव कंटेंटसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल चर्चा.

• धोरणात्मक चर्चासत्रे: धोरणकर्तेगुंतवणूकदारकलाकारतंत्रज्ञ आणि उद्योगपती यांच्यात थेट संवादाची संधी.

• क्रिएट इन इंडिया चॅलेंज जगभरातील नवोदित निर्मात्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साजरा करणारा एक अभूतपूर्व उपक्रमअर्थात मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवण्यासाठी  वेव्हज’ हे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.

• वेव्हेक्स 2025 हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरणार असून यामाध्यमातून मीडिया-टेक स्टार्टअप्स त्यांच्या नवकल्पना आघाडीच्या उद्योग धुरिणांसमोर आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांसमोर सादर करतीलज्यामुळे  भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवीन दिशा मिळेल.

• वेव्हज बाजार: चित्रपटगेमिंगसंगीतजाहिरात आणि एक्सआरनिर्मातेगुंतवणूकदार आणि इतर व्यवसायांना जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ. यातूनच उद्योग व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याच्या संधी देखील देते.

• मास्टरक्लासेस आणि परस्परसंवादी सत्रे उद्योगातील दिग्गज आणि जागतिक नेत्यांकडून शिकण्याचीमाध्यममनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्याची एक दुर्मिळ संधी.

00000