Search This Blog

Saturday 31 August 2024

प्रशासनाच्या विशेष मोहिमेतून जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ - जिल्हाधिकारी विनय गौडा




 

प्रशासनाच्या विशेष मोहिमेतून जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø मतदार याद्या प्रसिध्दनागरिकांनी आपले नाव तपासण्याचे आवाहन

Ø स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरामध्येही वाढ

चंद्रपूरदि. 31 : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. यात प्रामुख्याने नवमतदारांची नोंदणीमयत किंवा स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणेमतदार यादीत त्रृटी असल्यास त्यात दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्यात तब्बल 38637 मतदारांची वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यात आता 1000 पुरुष मतदारांमागे 965 स्त्री मतदार असून लिंग गुणोत्तर 9 ने वाढल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

            जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्दीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

            पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले1 जुलै 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादी 30 ऑगस्ट 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रतहसील कार्यालयेउपविभागीय अधिकारी कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाहीते लगेच तपासावेजेणेकरून कोणीही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. तसेच निवडणुकीची घोषणा होईपर्यंत नाव नोंदणी किंवा नाव वगळणे ही प्रक्रिया सुरू राहते. त्यामुळे नागरिकांनी वेळात वेळ काढून संबंधित ठिकाणी जावून आपले नाव तपासावेअसे आवाहन त्यांनी केले.

            जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात एकूण 17 लक्ष 92 हजार 147 मतदार होते. यात आता 51125 मतदारांची नव्याने नोंदणी झाली असून 12488 नावे मयत किंवा स्थलांतरीत झाल्यामुळे वगळण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ झाली असून जिल्ह्यात आता एकूण 18 लक्ष 30 हजार 784 मतदार आहेत. यात 9 लक्ष 31 हजार 821 पुरुष मतदार8 लक्ष 98 हजार 918 स्त्री मतदार तर 45 इतर मतदारांचा समावेश आहे.

18 ते 19 वयोगटातील 33825 युवा मतदार : जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 10488 ने वाढली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघ मिळून 33825 युवा मतदार आहेत. यात 18801 पुरुष15022 स्त्री आणि 2 इतर मतदार यांचा समावेश आहे.

मतदान केंद्रांची संख्या85 वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदार : जिल्ह्यात एकूण 2076 मतदार केंद्र असून राजूरा विधानसभा मतदार संघात – 344चंद्रपूर – 390बल्लारपूर – 366ब्रम्हपूरी – 319चिमूर – 314 आणि वरोरा विधानसभा मतदार संघात 343 मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात 85 वय आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 13987 आहे. तर दिव्यांग मतदार एकूण 8496 आहेत.

मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सहभाग नोंदविता यावायासाठी सर्व मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी. यासाठी मतदार यादी सर्व मतदान केंद्रतहसील कार्यालयेउपविभागीय अधिकारी कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागास प्रत्यक्ष भेट देऊन किंवा व्होटर्स हेल्पलाईन ॲप अथवा www.voters.eci.gov.in या वेब पोर्टलद्वारे अर्ज नमुना क्रमांक 6 भरून आपल्या नावाची नोंदणी करावीअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

0000000

पालकमंत्री यांचा 1 सप्टेंबर रोजीचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री यांचा 1 सप्टेंबर रोजीचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूरदि. 31 : राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 1 सप्टेंबर 2024 रोजीचा चंद्रपूर जिल्हा दौरा प्राप्त झाला आहे. त्यानुसार सकाळी 10 वाजता दुर्गापूर येथील सेंटमेरी स्कूल येथे महाआरोग्य शिबिरास उपस्थितीदुपारी 12 वाजता महाकाली वॉर्डचंद्रपूर येथे विश्व ब्राम्हण पांचाळा सेवा समितीतर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थितीदुपारी 3.30 वाजता चंद्रपूर निवासस्थानावरून बामणी (ता. बल्लारपूर) कडे प्रयाणदुपारी 4 वाजता बामणी येथे अमितनगरहनुमान मंदिराजवळ भोई समाजाच्या स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थितीसायंकाळी 7 वाजता कन्नमवार वॉर्ड बल्लारपूर येथे सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमास उपस्थितीरात्री 8.30 वाजता बल्लारपूर वरून चंद्रपूर कडे प्रयाणरात्री 9 वाजता चंद्रपूर निवासस्थानी आगमन व मुक्काम.

0000000

Friday 30 August 2024

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

 

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

चंद्रपूरदि. 30 : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत जिल्ह्यस्तरीय तांत्रिक प्रशिक्षण व कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील 170 शेतक-यांनी लाभ घेतला

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सनदी लेखापाल सुभाष रहांगडालेसंचालक ग्राम स्वयं प्रकल्पाचे संचालक प्रफुल आल्लुरवार, महा. आरआरनेटचे अनिकेत लिखार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश  हिरुडकरसहा.आयुक्त पशुसंवर्धन डॉ. वरठीडॉ. समीरण सास्तुरकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेद्र पराते उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुरेंद्र पराते यांनी राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेबद्दलसुभाष रहांगडाले आणि गायकवाड यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल, डीपीआर व होणा-या चुका व निराकरणप्रफुल्ल आल्लुरवार व कल्पेश माहुरे यांनी बँक कर्ज प्रक्रियासंचालक अनिकेत लिखार यांनी फिरते पशुपालकांसाठी राष्ट्रीय पशुधन अभियानडॉ. सास्तुरकर यांनी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळीपालनकुक्कुटपालनवैरण विकास व जिल्ह्य पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मंगेश काळेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी राष्ट्रीय पशुधन अभियानबाबत मार्गदर्शन केले.

शेतक-यांनी शेतीसोबत पशुपालन व राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेळीपालन, कुक्कुटपालनवैरण विकास योजनेचा लाभ घेऊन आर्थिक जीवनमान सुधारावे, असे आवाहनही मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी यशस्वी पशुपालक आशिष देवतळे यांनी केलेल्या कुक्कुटपालनबाबत व या योजनेंतर्गत 1 कोटीचा प्रकल्प शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले.

  कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले. संचालन डॉ. आंनद नेवारे यांनी तर आभार डॉ. प्रमोद जल्लेवार यांनी मानले. कार्यशाळेला जिल्ह्यातील 170 पशुपालक उपस्थित होते.

०००००००

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम


 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम

चंद्रपूर, दि. 30 : क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करण्याकरिता हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध खेळ उपक्रम घेण्यात आले.  यात 26 ऑगस्ट रोजी मार्गदर्शक संदिप उईके यांनी लिंबू-चमचा या मनोरंजक खेळाने सुरवात क्रीडा उपक्रमांना सुरुवात केली. विद्यार्थ्यांचे खेळाविषयक माहितीचे ज्ञान वाढावे यासाठी 27 ऑगस्ट रोजी ‘आलिम्पिक स्पर्धेत भारताचे महत्त्व’ या विषयावर निबंध स्पर्धा क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड यांनी घेतली. 28 ऑगस्ट ला विद्यार्थ्यांची खेळ प्रतिभा विकसित करण्यासाठी ‘आलिम्पिक व राष्ट्रीय क्रीडा दिन’ यावर चित्रकला स्पर्धा क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी घेतली.

29 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून खेळाडूंच्या रॅलीला संबोधित केले. या रॅलीमध्ये खेळाडूक्रीडा शिक्षकजेष्ठ नागरिकसमाजसेवकलोकप्रतिनिधीविद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी खेलो इंडीयाचे मार्गदर्शक रोशन भुजाडे उपस्थित होते. सायंकाळी राज्यराष्ट्रीय खेळाडू व पंच यांचा तसेच स्पर्धेत विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. छत्रपती अवॉर्ड खेळाडू कुंदन नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे जयश्री देवकरनंदू आवारे जिल्हा समन्वयक वाल्मीक खोब्रागडेविविध खेळ संघटनांचे पदाधिकारीसामाजिक संघटनालोकप्रतिनिधीनागरिक आदींनी सहकार्य केले.

००००००

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ

 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 30 : जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे 39 व्या नेत्रदान पंधरवाडयाचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकरवैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेकेजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. तारासिंग आडेनेत्र शल्य चिकित्सक डॉ. उल्हास सरोदेडॉ. जिनी पटेलनोडल अधिकारी  विवेक मसराममेट्रन श्रीमती आत्रामजिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. बोरकरडॉ. सावलीकर आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणा डॉ. चिंचोळे म्हणाले, जिवंतपणी रक्तदानकिडनी दानलिव्हर दान तर जाता- जाता अवयवदान आणि नेत्रदानाकरीता निर्सगाने  खास सोय केलेली आहे. मृत्युनंतर फक्त नेत्रदान करू शकतो. नेत्रदान केल्यानंतर  मृत्युपश्चातही दुसऱ्याच्या जिवनात आनंद देण्याचे कार्य करता येते. नेत्रदान केल्याने दोन जिवंत अंध व्यक्तींना दृष्टिप्रदान होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. सोनारकर म्हणाले, नेत्रदानाकरीता समाजात जागृती होणे हे आवश्यक आहे. ज्या कुटूंबातील व्यक्ती मृत्यु पावतो ते कुटुंब दु:खात असते, अशा वेळेत समाजातील  जागृत नागरिकांनी त्या कुटुंबातील नातेवाईकांसोबत  संवाद साधून नेत्र दानाचे महत्व पटवून द्यावे व नेत्रदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. डॉ. बंडू रामटेके यांनी कोणतेही दान  हे सर्वश्रेष्ठच आहे, परंतु नेत्रदान हे दृष्टिहिन रुग्णाच्या जिवनात आनंद निमार्ण करू शकतो म्हणून नेत्रदान केले पाहिजे, असे आवाहन केले.

प्रास्ताविकात नेत्रशल्य चिकित्सक डॉ. उल्हास सरोदे म्हणाले, भारतात 1 कोटी 40 लाख अंध आहेत.  त्यामध्ये 10 लाख रुग्ण बुब्बुळाच्या आजाराने अंध आहेत, यात दरवर्षी रुग्णांची संख्या वाढत आहे. नातेवाईकांच्या परवानगीने नेत्रदान करता येतो. याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे संपर्क साधावा व डॉक्टरांची टिम येईपर्यंत रुग्णाच्या पापण्या झाकून ठेवाव्याडोळयावर थंड पाण्याचा कपडा ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन नेत्रचिकित्सा अधिकारी निशा चांदेकर यांनी तर आभार नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला सामाजिक संस्थेमध्ये नेत्रदानाकरीता प्रत्यक्ष मदत करणारेबढते कदमचे सदस्य सुरेश हरीरामणीअंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य प्रदिप अडकिणेरोटरी क्लॅबचे गमेश दोशीगुरुमाऊली अध्यात्मिक मंडळएनसीडी कार्यक्रम व नेत्रविभागातील अधिकारी व कर्मचारीनर्सिंग स्कुलचे विद्यार्थी व रुग्ण उपस्थित होते.

०००००

 

Thursday 29 August 2024

सण, उत्सव आनंदाने आणि शांततेत साजरे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे

 





सण, उत्सव आनंदाने आणि शांततेत साजरे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे

Ø जिल्हाधिका-यांचे गणेश मंडळ व नागरिकांना आवाहन

Ø जिल्हा शांतता समितीची बैठक

Ø नागरिकांच्या सुचनांची प्रशासनाकडून दखल

चंद्रपूरदि. 29 : आगामी काळात जिल्ह्यात पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद असे सर्वधर्मीय सण मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. चंद्रपूर हा जिल्हा शांततेसाठी प्रसिध्द आहे. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राखण्यासाठी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत आणि उत्साहात साजरे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

नियोजन सभागृह येथे पोलिस दलातर्फे आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, सहायक पोलिस अधीक्षक नियोमी साटम, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, पोलिस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सण आणि उत्सवासंदर्भात प्रशासनाकडून देण्यात येणा-या सूचनांचे सर्वांनी गांभिर्याने पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शहरात तसेच तालुका स्तरावर महसूल, नगर पालिका प्रशासन आाणि पोलिस विभागाच्या अधिका-यांनी मिरवणुकीचा मार्ग, विसर्जन स्थळ आदींना त्वरीत भेट देऊन पाहणी करावी. गणेश मंडळांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक शिफ्टकरीता किमान एक स्वयंसेवक, मुर्ती आणि मंडपाच्या संरक्षणासाठी नेमावा. सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक मंडळाने मंडप उभारतांना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच दुचाकी-चारचाकी वाहने सुरळीत वाहतूक करू शकतील, याची दक्षता घ्यावी. लेजर लाईटवर बंदी आहे, त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये. डीजे चा आवाज मर्यादेतच ठेवावा. राष्ट्रगीत आणि राज्यगीताचा एक ठराविक प्रोटोकॉल आहे, त्यामुळे डीजेवर राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवू नये. तसेच मंडळांनी फायर ऑडीट करून घ्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्याचा शांततेचा लौकिक कायम ठेवा : आमदार किशोर जोरगेवार

चंद्रपूर जिल्हा हा राज्यात शांततेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वधर्मीय सण येथे अतिशय आनंदाने आणि शांततेत पार पाडण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो. शांततेची हीच ओळख कायम ठेवावी, अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. पुढे ते म्हणाले, शांतता समितीच्या सदस्यांकडून आलेल्या सुचनांची प्रशासनाने नोंद घेतली आहे.  सर्व मंडळांनी विसर्जनाच्या मिरवणुका वेळेत काढाव्यात. श्रींच्या मुर्तीकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी मंडळांनी दक्षता घ्यावी. प्रशासनाच्या सुचनांचे सर्वांनी पालन करावे व हा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडावा, असे आवाहनही त्यांनी केले.

चांदा क्लब ग्राऊंडवरच मूर्ती आणि पुजेचे साहित्य मिळणार : मूर्ती आणि पुजेचे साहित्य खरेदीकरीता रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी चांदा क्लब ग्राऊंड हे मूर्तीकरीता आणि पुजेच्या साहित्याकरीता उपलब्ध करून देण्यात आले आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. शहरातील 100 टक्के गणेश मुर्तीचे विसर्जन हे महानगर पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रीम कुंडामध्येच करावे. तसेच विविध परवानगीसाठी मनपाच्या वतीने ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात आली आहे, गणेश मंडळांनी त्वरीत त्यासाठी अर्ज दाखल करावे, असे आवाहन महानगर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. 

मिरवणुका विनाकारण रस्त्यावर थांबवू नये : अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू

सर्व गणेश मंडळांनी दिलेल्या वेळेतच विसर्जनाची मिरवणूक काढावी. कोणत्याही धार्मिक स्थळासमोर किंवा रस्त्यावर विनाकारण मिरवणूक थांबवू नये, त्या सतत पुढे नेऊन रस्ता मोकळा करावा. जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रशासनाच्या एका ठेक्याला सर्व साऊंड सिस्टीम बंद करावी. पोलिस आपल्या मदतीला आहेच, काही अघटीत घडण्याची माहिती असल्यास त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले.

नागरिकांच्या सुचना : यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सूचना केल्या. यात सायबर सेलच्या माध्यमातून अफवांवर नियंत्रण ठेवावे. नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये, रस्त्यावरचे गड्डे त्वरीत बुजवावे, शांतता समितीची बैठक तीन महिन्यातून एकदा घ्यावी, गणेश मंडळांना मंडपसाठी सिमांकन करून द्यावे, विसर्जन स्थळी सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, डीजे चा आवाज मर्यादेत असावा, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करावे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, डॉक्टरांचे पथक तयार ठेवावे आदींचा यात समावेश होता.

००००००

पी.एम. जनमन योजनेअंतर्गत आदिम कोलाम लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप





पी.एम. जनमन योजनेअंतर्गत

आदिम कोलाम लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

चंद्रपूरदि. 29 : बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिम जमातींच्या विकासाकरिता पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन योजनेची मागच्या वर्षी सुरुवात करण्यात आली होती. आता या योजनेचा दुसरा टप्पा 25 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाला असून  जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील अभियानाची सुरुवात जिवतीराजुरा आणि कोरपना या आदिम बहुल तालुक्यांतून विविध सेवांच्या आयोजनाने करण्यात येत आहे. 

त्यानुसार कोरपना तालुक्यातील एकूण 430 लाभार्थ्यांना, राजुरा तालुक्यातील 54 आणि जिवती तालुक्यातील 509 लाभार्थ्यांना जातीचे दाखलेउत्पन्नाचे दाखलेआयुष्यमान भारत कार्डजॉबकार्डआरोग्य तपासणीआधार कार्ड नुतनीकरणपी.एम. किसान योजनाविद्युत जोडणीमतदार कार्डरेशन कार्डसंजय गांधी योजनाअधिवास प्रमाणपत्र जनधन खाते अशा विविध योजनांचा लाभ मिळालेला आहे.

            या अभियानांतर्गत प्रथम चरणात वंचित राहिलेल्या जिवतीराजुराआणि कोरपना या आदिम बहुल तालुक्यांतील लाभार्थ्यांना आधार कार्डआयुष्यमान भारत कार्डजातीचे दाखलेजनधन खातेअधिवास प्रमाणपत्रउत्पन्न दाखलेमतदान कार्डकिसान क्रेडिट कार्डरेशन कार्ड इत्यादी ‍विविध दाखले शिबिरांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आदिम जमातीतील कुटुंबांना पक्के घरनल से जल योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणेपाडे व वस्त्यांना  रस्त्याने जोडणेप्रत्येक घराला वीज जोडणी  उपलब्ध करुण देणेपोषण आहार आणि आरोग्य सुविधावस्त्यापाडे मोबाईल आणि इंटरनेट  सुविधेने जोडणेबेरोजगारांसाठी कौशल्य विकास योजना राबविणेउपजिविका साधनांची  निर्मिती करणेवैयक्तिक वनहक्क दावे धारकांना पीएम – किसान योजनेचा लाभ देण्यात येत आहे. सदर अभियान जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मार्गदर्शनात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचे समन्वयाने आणि संबंधित सर्व शासकीय विभागांचे सहकार्याने 27 ऑगस्ट 2024 पासून पार पडत आहे.

            एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर द्वारे जिल्ह्यात आदिवासींसाठी 10 सप्टेंबर 2024 पर्यंत राजुराकोरपना व जिवती तालुक्यात अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनांचा तसेच वरील ठिकाणी असलेल्या शिबिराला आदिम समुदायाने उपस्थित राहून आवश्यक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

०००००००

गणेश मंडळांना देणगी गोळा करण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

 गणेश मंडळांना देणगी गोळा करण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

Ø  धर्मादाय आयुक्तांकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 29:  जिल्ह्यातील गणेशा मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाकरिता (सार्वजनिक विश्वसत व्यवस्था वगळून इतरांना) रोख रकमेच्या किंवा वस्तूच्या स्वरुपात कोणताही पैसावर्गणी  किंवा  देणगी गोळा करण्याकरीता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41- क नुसार सहायक धर्मादाय आयुक्तचंद्रपूर यांची  पूर्वपरवानगी घ्यावी. त्याकरीता   www.charity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर  आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज करून सहायक धर्मादाय आयुक्तचंद्रपूर यांचे कडून ऑनलाईन परवानगी / प्रमाणपत्र देण्यात येईल. 

अर्जासोबत दाखल करावयाची कागदपत्रे : 1 अर्ज पूर्णपणे भरलेला असावा. 2. मंडळाच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी  असलेल्या ठरावाची प्रत. 3. सर्व सदस्यांचे ओळखपत्र  4. जागेबाबत जमीन मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र 5. नगरसेवकसरपंच किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांचे शिफारसपत्र 6. विद्युत बिलाची प्रत 7. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र 8. मागील वर्षीचे  परवानगीची प्रत 9. मागील वर्षाचे जमा खर्चाचा हिशोब.

कलम 41 क  च्या तरतुदींचे उल्लंघन करूनसहायक धर्मादाय आयुक्तचंद्रपूर यांची परवानगी न घेता पैसावर्गणी किंवा देणगी गोळा केल्यास व तसा दोषसिध्द झाल्यासतीन महिन्यापर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलित रकमेच्या किंवा अंशदानाच्या दीडपटीपर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील. त्यामूळे सर्व मंडळानी वर्गणी गोळा करण्यापूर्वी रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे, असे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.

०००००

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

         उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक                        पुरस्कारासाठी अर्ज  सादर करण्याचे आवाहन

            चंद्रपूरदि. 29 :   महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा,  ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे  या ऊद्देशाने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र)  पुरस्कार देण्यात  येतो.

            राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ,क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 1 लक्ष, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजार रुपये तसेच सन्मान चिन्हप्रमाणपत्रग्रंथभेट आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात येते. सन 202324 या वर्षीच्या पुरस्कारसाठी इच्छुक असणारी ग्रंथालयेकार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज  आवश्यक त्या कागदपत्रांसह 25 सप्टेंबर 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत,  असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

०००००

2 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

2 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि29 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे  आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येतेया लोकशाही  दिनानिमित्त  नागरीक व शेतकरी  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवारदि2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे लोकशाही   दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी प्रतीत सादर करावातक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीतद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईलअसे निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.

००००००

1965 आणि 1971 च्या युध्दामध्ये सक्रिय भाग घेतलेल्या अधिकारी/ जवान/विधवा यांच्याकरीता युध्द सम्मान योजना

 

1965 आणि 1971 च्या युध्दामध्ये सक्रिय भाग घेतलेल्या अधिकारी/ जवान/विधवा यांच्याकरीता युध्द सम्मान योजना

            चंद्रपूरदि. 29 : युध्द सम्मान योजनेअंतर्गत सन 1965 आणि 1971 च्या युध्दामध्ये सक्रिय भाग घेतलेल्या  आणि समर सेवा मेडल / पुर्वी स्टार्स मेडल /पश्चिमी स्टार्स मेडल प्राप्त व्यक्ती किंवा त्यांच्या पत्नी (SSCOs/ECOs, Regular Commissioned Officers)   यांना केंद्रिय सैनिक कल्याण बोर्डनवी दिल्ली यांच्याकडून एकरकमी 15 लाख रुपये ‘युध्द सन्मान योजना’  तयार करण्याचा  प्रस्ताव विचाराधीन आहे. ज्या माजी सैनिकांनी सन 1965 व 1971 च्या युध्दात भाग घेतलेला होता आणि डिर्स्चाज बुक मध्ये समर सेवा मेडल आणि पुर्वी स्टार्स मेडल/ पश्चिमी  स्टार्स मेडल मिळाल्याची नोंद आहे, अशा माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे 2 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावे .

अर्जासोबत सादर करावयाची  कागदपत्रे : माजी सैनिक/ विधवांच्या संपूर्ण डिस्चार्ज बुक व ओळखपत्रांची झेरॉक्स,   पेन्शन स्लीप, ज्यांचेकडे शेतजमीन आणि राहण्याकरीता घर आहे, त्याचा सरपंच/ ग्रामसेवक /तलाठी यांचा दाखला, मागील पाच वर्षाचे इंन्कम टॅक्स रिटर्नची छायाकिंत प्रत  किंवा इंन्कम टॅक्स २AS फार्म, सध्याचा उत्पन्नाच्या साधनाचा तपशिल व उत्पन्नाचा दाखला, नॉन पेन्शनर यांनी शासकीय पेंशन मिळत नसल्याबाबतचे  स्वयंघोषणापत्र.

उपरोक्त अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या माजी सैनिकांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे 2 सप्टेंबर 2024 पूर्वी सादर करावे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

०००००

मच्छिमार, मत्स्यसंवर्धक ,मत्स्य कास्तकारांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

 

मच्छिमारमत्स्यसंवर्धक ,मत्स्य कास्तकारांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

Ø 14 घटकांसाठी कर्जदर निश्चित

चंद्रपूरदि. 29 : मच्छीमारमत्स्यसंवर्धकमत्स्य कास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून   सन 2024-25 या वर्षांकरतिा राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे.         

            सर्वजाती मत्स्यपालनकरीता प्रति हेक्टर शेततळे 5 लाख रुपये कर्ज दर निश्चित करण्यात आला आहे. नदीतलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने मासेमारी 80 हजार रुपयेनिमखारे पाण्यातील सर्वजाती मत्स्यपालन प्रति हेक्टर 3 लाख रुपये,  निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रति हेक्टर 3 लाख रुपये, टॉलर मच्छीमार नौका 3 लाख रुपये,  पर्सिसीन मच्छीमार नौका 3 लाख रुपयेगील नेटर मच्छीमार नौका 3 लाख रुपयेबिगर यांत्रिक मच्छीमार नौका 80 हजार रुपयेयांत्रिक मच्छीमार नौका 1 लाख 50 हजार रुपयेशोभीवंत मत्स्यपालन 1 लाख रुपयेगोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय 2 लाख रुपये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन 50 हजार रुपये अशा एकूण 14 घटकांना कर्जदर निश्चित करण्यात आलेला आहे.

            राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमारमत्स्यसंवर्धक ,मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा  लाभ घेण्यासाठी जिल्हयाचे सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे मत्स्यव्यवसाय विकास विभागाने कळविले आहे.

०००००

ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोपेड, ई-स्कुटर, ई-रिक्षा

 

ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोपेडई-स्कुटरई-रिक्षा

चंद्रपूर, दि. 29 : समाज कल्याण विभागाच्या 5 टक्के  दिव्यांग कल्याण अखर्चित निधीतून दिव्यांगांसाठी वयैक्तीक लाभाच्या योजना सन 2024-25 मध्ये राबविण्यात येत आहे. तरी  ग्रामिण क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींनी योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने अर्ज आणि आवश्यक दस्ताऐवज जि.प. समाज कल्याण विभाग, चंद्रपूर येथे सादर करावयाचे आहेत.

दिव्यांग व्यक्तींना अर्जासोबत किमान 40 टक्के दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्रआधार कार्डबॅक पासबुक18 वर्ष पूर्ण झाल्याचा वयाचा पुरावारहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र या कागदपत्रासह ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागातील दिव्यांगांनी अर्ज ग्रामपंचायतपंचायत समितीजि.प.  समाज कल्याण विभाग येथून घ्यावेत व  सदर अर्ज संबंधित पंचायत समिती किंवा समाज कल्याण विभागजि.प. येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

००००००००

Wednesday 28 August 2024

वेकोली (WCL) संदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे होणार निवारण

 

वेकोली (WCL) संदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे होणार निवारण

Ø  पालकमंत्री कार्यालयात निवेदन सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 28:  जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विनंतीनुसारकेंद्रीय कोयला तथा खान मंत्री जी. किशन रेड्डी यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील वेकोली (WCL) संदर्भात नागरिकांचे असलेले विविध प्रश्न व तक्रारीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन नियोजन भवनचंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगानेनागरिकांना वेकोली (WCL) संदर्भात असलेल्या तक्रारीबाबत काही निवेदने द्यावयाची असल्यास पालकमंत्री कार्यालयाचे 9552799608 या व्हॉट्सअॅप क्रमाकांवर अथवा पालकमंत्री कार्यालयनियोजन भवन येथील प्रशांत खर्डीवार यांच्याकडे सादर करावीत.असे आवाहन पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे.

००००००

मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त 29 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

 

मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त 29 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 28 : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर यांना एकूण तीन भेटी द्यायच्या आहेत. त्या अनुषंगाने मतदार यादी प्रसिध्द  करण्याच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची तिसरी भेट 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी कळविले आहे.

००००००