Search This Blog

Friday 16 August 2024

मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्या - विभागीय आयुक्त बिदरी

 मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून

कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्या

- विभागीय आयुक्त बिदरी

Ø   मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त कार्यक्रमाचा आढावा

चंद्रपूर, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांचा आढावा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दुरदृषप्रणालीमार्फत घेतला. मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी., उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी तथा राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पुढे म्हणाल्या, नुकताच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकी दरम्यान वगळण्यात आलेल्या मतदारांच्या नावाचे सुक्ष्म निरिक्षण करुन मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) यांनी संबंधितांची भेट घेऊन नव्याने नावे नोंदविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच बीएलओ यांना दिलेल्या कामाचा नियमित आढावा घ्यावा. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीनी संबंधित बीएलओची मदत घेऊन मतदार यादीतील तक्रारीचे निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

लोकसभा निवडणूकी दरम्यान आलेल्या अडचणी पुन्हा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्हयात आयोजित करण्यात आलेल्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. या कार्याक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरास नवमतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून ऑफलाईन व ऑनलाईन एकुण 50785 अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्हयातील सर्व विधानसभा क्षेत्रानुसार एकुण 2069 मतदान केंद्र असून त्यानुसार 2069 बीएलओची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.

०००००००

No comments:

Post a Comment