Search This Blog

Tuesday 13 August 2024

मनपाच्या तिरंगा ध्वज रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद




 

मनपाच्या तिरंगा ध्वज रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर, दि. 13 :  ‘हर घर तिरंगा’ अर्थात घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत चंद्रपूर शहर महानगर पालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा ध्वज दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने मनपाचे अधिकारी - कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.  

मंगळवारी सकाळी 10.30 वाजता प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथून महापालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त श्री. पालीवाल म्हणाले, घरोघरी तिरंगा अभियानात आतापर्यंत शहरात 30 हजार ध्वजांचे वाटप करण्यात आले आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरीप्रत्येक दुकानात व विविध आस्थापनेत तिरंगा लागावा, असे आवाहन त्यांनी केले.

सदर दुचाकी रॅली प्रियदर्शनी चौक ते वरोरा नाका, सावरकर चौक, बंगाली कॅम्प, परत सावरकर चौक, प्रियदर्शिनी चौक, जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट, बागला चौक ते अंचलेश्वर गेट असे मार्गक्रमण करीत मनपा कार्यालय, गांधी चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

            रॅलीत आयुक्त विपीन पालीवालजिल्हा नगर विकास सहआयुक्त विद्या गायकवाडअतिरीक्त आयुक्त चंदन पाटीलउपायुक्त मंगेश खवले यांनी दुचाकीवर स्वार होत सहभाग नोंदविला. याप्रसंगी भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची तिरंगा शपथ घेण्यात आली. तिरंगा फुगे आकाशात सोडण्यात आले. विविध वाहनांना तिरंगा रथ बनविण्यात आले होते. भारतमाता तसेच विविध महात्म्यांची वेशभूषा करून शालेय विद्यार्थी उपस्थित होते. तसेच उपस्थितांनी येथे लावण्यात आलेल्या कॅनवासवर जय हिंदभारत माता की जय लिहून अभियानास समर्थन दर्शविले.      

            याप्रसंगी शहर अभियंता विजय बोरीकरनगर रचनाकार सुनील दहीकरसहायक आयुक्त नरेंद्र बोबाटेसचिन माकोडेसंतोष गर्गेलवारडॉ.नयना उत्तरवाररवींद्र कळंबेअतुल टिकलेआशिष भारतीडॉ.अमोल शेळकेनागेश नितरफीक शेखसोनू थुलभूपेश गोठेसंजय टिकलेभुषण ठाकरेडॉ.अश्विनी भारत,आशिष जीवतोडे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment