Search This Blog

Saturday 3 August 2024

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने बल्लारपूर येथील व्यायामशाळा आणि आर.ओ. मशीनकरीता निधी वितरीत

 

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने बल्लारपूर येथील व्यायामशाळा आणि आर.ओ. मशीनकरीता निधी वितरीत

Ø व्यायामशाळेकरीता 48 लक्ष 52 हजार तर आर.ओ. मशीनकरीता 10 लक्ष रुपये मंजूर

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे युवक आणि खेळाडूंनी मानले आभार

चंद्रपूरदि. 03 : जिल्ह्यात पायाभूत सुविधांसोबतच आरोग्यशिक्षणकृषीसिंचनक्रीडा आदींचे जाळे उभारण्यासाठी राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या पुढाकारानेच नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत बल्लारपूर येथील व्यायामशाळेकरीता 48 लक्ष 52 हजार तर विसापूर येथील क्रीडा संकूलात आर.ओ. मशीन करीता आमदार निधीतून 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 या वर्षात नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत 14 कोटी 46 लक्ष रुपये (3.5 टक्के) शासनाकडून अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या योजनेतून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने बल्लारपूर येथील झाकीर हुसेन वॉर्डातील व्यायामशाळेच्या पहिल्या माळ्यावर अत्याधुनिक सभागृहमेडीटेशन म्युजीक व इतर बांधकामाकरीता 48 लक्ष 52 हजार रुपये ऐवढ्या रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

विसापूर ता. बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकूल येथे खेळाडूंना पिण्याचे शुध्द पाणी मिळण्यासाठी आर.ओ संयंत्र बसविण्याकरीता आमदार निधीतून 10 लक्ष रुपये मंजूर झाले असून सदर निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे. व्यायामशाळा आणि आर.ओ. करीता निधी मंजूर केल्यामुळे युवक तसेच खेळाडूंनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

0000000

No comments:

Post a Comment