Search This Blog

Tuesday 20 August 2024

राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांचा 22 ऑगस्ट रोजी वरोरा तालुक्याला दौरा

 राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांचा 22 ऑगस्ट रोजी वरोरा तालुक्याला दौरा  

चंद्रपूरदि. 20 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत करावयाच्या कामकाजाबाबत विविध  कार्यालयीन तपासणी करिता तसेच तसेच चर्चे करिता राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर हे 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता उपविभागीय  कार्यालय वरोरा  येथे भेट देणार आहेत. तसेच तिथे तालुका स्तरीय विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

यावेळी ते वरोरा तहसील येथील विविध शासकीय  विभागांची कार्यालयीन तपासणी सुद्धा करणार आहे सदर कालावधीत विविध  सेवेसंबंधात सूचना किंवा नागरिकांना आपले म्हणणे मांडावयाचे असल्यास अभ्यागताना आयुक्तांना भेटता येईलअशी माहिती  वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी दिली आहे.

000000

No comments:

Post a Comment