Search This Blog

Friday 30 August 2024

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

 

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

चंद्रपूरदि. 30 : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत जिल्ह्यस्तरीय तांत्रिक प्रशिक्षण व कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील 170 शेतक-यांनी लाभ घेतला

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सनदी लेखापाल सुभाष रहांगडालेसंचालक ग्राम स्वयं प्रकल्पाचे संचालक प्रफुल आल्लुरवार, महा. आरआरनेटचे अनिकेत लिखार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश  हिरुडकरसहा.आयुक्त पशुसंवर्धन डॉ. वरठीडॉ. समीरण सास्तुरकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेद्र पराते उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुरेंद्र पराते यांनी राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेबद्दलसुभाष रहांगडाले आणि गायकवाड यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल, डीपीआर व होणा-या चुका व निराकरणप्रफुल्ल आल्लुरवार व कल्पेश माहुरे यांनी बँक कर्ज प्रक्रियासंचालक अनिकेत लिखार यांनी फिरते पशुपालकांसाठी राष्ट्रीय पशुधन अभियानडॉ. सास्तुरकर यांनी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळीपालनकुक्कुटपालनवैरण विकास व जिल्ह्य पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मंगेश काळेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी राष्ट्रीय पशुधन अभियानबाबत मार्गदर्शन केले.

शेतक-यांनी शेतीसोबत पशुपालन व राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेळीपालन, कुक्कुटपालनवैरण विकास योजनेचा लाभ घेऊन आर्थिक जीवनमान सुधारावे, असे आवाहनही मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी यशस्वी पशुपालक आशिष देवतळे यांनी केलेल्या कुक्कुटपालनबाबत व या योजनेंतर्गत 1 कोटीचा प्रकल्प शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले.

  कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले. संचालन डॉ. आंनद नेवारे यांनी तर आभार डॉ. प्रमोद जल्लेवार यांनी मानले. कार्यशाळेला जिल्ह्यातील 170 पशुपालक उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment