Search This Blog

Friday 23 August 2024

आदिम कोलाम लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचा तिढा सुटणार

 

आदिम कोलाम लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचा तिढा सुटणार

Ø पी.एम. जनमन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात

Ø जातीचे दाखलेआधारकिसान क्रेडीट व रेशन कार्डही काढता येणार

चंद्रपूर, दि. 23 : भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिम जमातींच्या विकासाकरिता पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अर्थात पी.एम. जनमन योजनेची गतवर्षी सुरूवात करण्यात आली होती. आता या योजनेचा दुसरा टप्पा दिनांक 25 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत असून जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील अभियानाची सुरूवात जीवतीराजुरा आणि कोरपणा या आदिम बहुल तालुक्यांतून विविध सेवांचे आयोजनाने करण्यात येणार आहे. यात आदिम कोलाम लाभार्थ्यांना जातीचे दाखले, आधारकार्ड, किसान क्रेडीट कार्ड व रेशनकार्डही उपलब्ध करून देण्यात येईल. 

प्रथम चरणात वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना दुस-या टप्प्यात आधार कार्डआयुष्यमान भारत कार्डजातीचे दाखलेजनधन खातेअधिवास प्रमाणपत्रउत्पन्न दाखलेमतदान कार्डकिसान क्रेडीट कार्डरेशन कार्ड इत्यादी विविध दाखले शिबिरांचे माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आदिम जमातीतील कुटुंबांना पक्के घरनल से जल योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणेपाडे व वस्त्यांना रस्त्याने जोडणेप्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध करून देणेपोषण आहार आणि आरोग्य सुविधावस्त्यापाडे मोबाईल आणि इंटरनेट सुविधेने जोडणेबेरोजगारांसाठी कौशल्य विकास योजना राबविणेउपजिविका साधनांची निर्मिती करणेवैयक्तिक वनहक्क दावेधारकांना पीएम-किसान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

सदर अभियान जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या समन्वयाने व संबंधित सर्व शासकीय विभागांच्या सहकार्याने पार पडणार आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर द्वारे जिल्ह्यात आदिवासींसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. या योजनांचा तसेच दुस-या टप्प्यातील शिबिराला आदिम समुदायाने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment