Search This Blog

Friday, 30 August 2024

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम


 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम

चंद्रपूर, दि. 30 : क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करण्याकरिता हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध खेळ उपक्रम घेण्यात आले.  यात 26 ऑगस्ट रोजी मार्गदर्शक संदिप उईके यांनी लिंबू-चमचा या मनोरंजक खेळाने सुरवात क्रीडा उपक्रमांना सुरुवात केली. विद्यार्थ्यांचे खेळाविषयक माहितीचे ज्ञान वाढावे यासाठी 27 ऑगस्ट रोजी ‘आलिम्पिक स्पर्धेत भारताचे महत्त्व’ या विषयावर निबंध स्पर्धा क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड यांनी घेतली. 28 ऑगस्ट ला विद्यार्थ्यांची खेळ प्रतिभा विकसित करण्यासाठी ‘आलिम्पिक व राष्ट्रीय क्रीडा दिन’ यावर चित्रकला स्पर्धा क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी घेतली.

29 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून खेळाडूंच्या रॅलीला संबोधित केले. या रॅलीमध्ये खेळाडूक्रीडा शिक्षकजेष्ठ नागरिकसमाजसेवकलोकप्रतिनिधीविद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी खेलो इंडीयाचे मार्गदर्शक रोशन भुजाडे उपस्थित होते. सायंकाळी राज्यराष्ट्रीय खेळाडू व पंच यांचा तसेच स्पर्धेत विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. छत्रपती अवॉर्ड खेळाडू कुंदन नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे जयश्री देवकरनंदू आवारे जिल्हा समन्वयक वाल्मीक खोब्रागडेविविध खेळ संघटनांचे पदाधिकारीसामाजिक संघटनालोकप्रतिनिधीनागरिक आदींनी सहकार्य केले.

००००००

No comments:

Post a Comment