Search This Blog

Friday 16 August 2024

आग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सक्षम यंत्रणा उभी करणार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे 20 अग्निशमन बुलेट जिल्ह्याच्या सेवेत




 आग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सक्षम यंत्रणा उभी करणार

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे

20 अग्निशमन बुलेट जिल्ह्याच्या सेवेत

स्वातंत्र्यदिनाला श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले लोकार्पण

चंद्रपूरदि. 16 : चंद्रपूर हा जंगलव्याप्त जिल्हा असल्यामुळे येथे उन्हाळ्यात वनवणवा पेटण्याची शक्यता असते. तसेच येथे मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे असून अचानक आग लागल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक ठिकाणांवरून अग्नीशामक वाहने त्वरीत उपलब्ध व्हाव्यातयासाठी जिल्ह्यात सक्षम यंत्रणा उभी केली जाईल. तसेच जिल्ह्यात फायर ब्रिगेड संदर्भात एक मोठे सेंटरही उभे करण्याचा मानस आहेअशी ग्वाही राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्याला 20 अग्नीशमन बुलेट (बाईक) मिळाल्या आहेत. स्वातंत्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर या अग्निशमन बुलेटचे लोकार्पण श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनजिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शननगर पालिका प्रशासन सह आयुक्त विद्या गायकवाड व इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील 17 नगर पालिका / नगर पंचायतींसाठी 20 अग्निशमन बुलेट गाड्या घेण्यात आल्या आहेतअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेअरुंद रस्त्यावरगल्लीबोळीत किंवा झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या फायर ब्रिगेड गाड्या आग विझविण्यासाठी जावू शकत नाही. अशा ठिकाणी लागलेली आग विझविण्यात यावीयासाठी मदत व पुनर्वसन विभागाच्या सहाय्याने या गाड्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अचानकपणे कुठेही आग लागू शकतेत्यावर त्वरीत नियंत्रण मिळविण्यासाठी फायर ब्रिगेड संदर्भात जिल्ह्यात एक मोठे सेंटर उभे करण्यात येईलअसेही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

अशा आहेत अग्निशमन बुलेट गाड्या

वॉटर मिस्ट रॅपिड फायर फायटिंग बाईक्स आणि कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक्स अश्या दोन प्रकारच्या दुचाकी आहेत. यामध्ये भिसीब्रह्मपुरीचिमूरगडचांदूरघुग्घुसगोंडपिंपरीजिवतीकोरपनामुलनागभीडपोंभुर्णाराजुरासावली आणि सिंदेवाही या गावांसाठी प्रत्येकी 1 वॉटर मिस्ट्र रॅपिड फायर फायटिंग बाईक्स (दुचाकी) तर बल्लारपूरवरोरा आणि भद्रावतीसाठी प्रत्येकी 2 कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक्स (दुचाकी) देण्यात आल्या आहेत.

असा होणार उपयोग

छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीच्या ठिकाणी तातडीने वापरता येणारी प्रथम प्रतिसाद यंत्रणा म्हणून या दुचाकीचा अत्यंत प्रभावी वापर होणार आहे. तेल व गॅसमुळे लागलेली तसेच विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेली आगही या दुचाकीद्वारे विझवता येणार आहे. ज्या ठिकाणी फायर टेंडरच्या गाड्या पोहोचू शकणार नाहीतअशा अरुंद गल्ली बोळात तसेच झोपडपट्टीमध्येही या दुचाकी सहज पोहोचू शकतात व भडकणा-या आगीवर ते 12 मीटर अंतरावरुन तसेच 30 फूट उंचीपर्यंत मिस्ट (Mist) स्वरुपात फवारा मारु शकतात. यामध्ये पाण्यासोबतच रासायनिक फोमचा वापर केल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार आहे.

00000

No comments:

Post a Comment