Search This Blog

Sunday 18 August 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 19 व 20 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 19 व 20 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर दि. 18 : कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेअंतर्गत 12 पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार रुपयेआय.टी.आय./ पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर/ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदचंद्रपूर येथे 19 व 20 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात ऑफलाईन अर्ज सादर करावेअसे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment