Search This Blog

Thursday 29 August 2024

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

         उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक                        पुरस्कारासाठी अर्ज  सादर करण्याचे आवाहन

            चंद्रपूरदि. 29 :   महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा,  ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे  या ऊद्देशाने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र)  पुरस्कार देण्यात  येतो.

            राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ,क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 1 लक्ष, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजार रुपये तसेच सन्मान चिन्हप्रमाणपत्रग्रंथभेट आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात येते. सन 202324 या वर्षीच्या पुरस्कारसाठी इच्छुक असणारी ग्रंथालयेकार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज  आवश्यक त्या कागदपत्रांसह 25 सप्टेंबर 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत,  असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment