Search This Blog

Friday 23 August 2024

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 36 लागू

 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 36 लागू

            चंद्रपूरदि. 23 : 26 ते २७ ऑगस्ट  दरम्यान  श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला (दहीहांडी) हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार असल्याने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 17 ऑगस्ट पासून 27 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबतवाद्य वाजविणे बाबतसभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबातमिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबतलाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. यात

अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकारइ) मिरवणुकीस बाधा होणार नाहीयाबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ  लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकारई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणेगाणी गाणेढोल ताशे वाजविणे  इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकारउ)   रस्ते व इतर सर्व  सार्वजनिक ठिकाणी    सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकारऊ) सार्वजनिक  ठिकाणी/ रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार ऋ) कलम 33,  35,  37ते 404243व 45 मुंबई  पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.

सदर आदेश लागू असताना सभामिरवणुकीत वाद्य वाजविणेलाऊडस्पिकर वाजविणेमिरवणुकीत नारे लावणेमिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमूद आहे.  

०००००

 

No comments:

Post a Comment