Search This Blog

Tuesday 13 August 2024

ओ.बी.सी. प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील युवक- युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना

 ओ.बी.सी. प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील युवक- युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना

चंद्रपूरदि. 13 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि  विकास महामंडळाकडे गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि लिंगायत समाजासाठी जगद्ज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार झाली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि  विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे.

1 लक्ष रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना : इतर मागास  प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील व्यक्तींना स्वयंरोजगार व लघुउद्योग  सुरु करण्याकरीता 1 लक्ष रुपयांची निरंक व्याजदर असलेली थेट कर्ज योजना सुरु केली आहे. सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. कर्ज परतफेडीचा कालावधी  हा 4 वर्षापर्यंतचा असून नियमित 48  समान मासिक हप्त्यांमध्ये  मुद्दल  2085 रुपये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे  लागणार नाही. परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे 4 टक्के व्याज आकारण्यात  येईल. कुटुंबाचे  वार्षिक उत्पन्न 1 लक्ष रुपयांपर्यंत असावे.

या महामंडळामार्फत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनशासकीय दुध डेरी रोडजलनगर वार्डचंद्रपूर येथे तसेच संपर्क क्रमांक 07172- 262420 येथे संपर्क साधावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि  विकास महामंडळाच्या जिल्हा  व्यवस्थापकांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment