Search This Blog

Wednesday 21 August 2024

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांकडून विशेष गौरव पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित

 

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांकडून

विशेष गौरव पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित  

चंद्रपूरदि. 21 : विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांना एकरकमी 10 हजार व 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कार निवडीसाठी संबंधितांनी आपले प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेअसे सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

इयत्ता 10 वी व 12 वी च्या परिक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या पाच माजी सैनिक/ विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

पुरस्काराकरीता पात्रता : केन्द्रीय शिक्षण बोर्डनवी दिल्ली येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या ग्रेड शीट निष्पादन प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. तरी सदर प्रकरणासोबत संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारी सह जोडण्यात यावे. पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांना एकरकमी 10 हजाररुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.

तसेच राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडूसाहित्यसंगीतगायनवादननृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेतेयशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारेसंगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारेपुर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणारेतसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इ. यांना अशा कार्याबद्दल त्यांचा सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा पुरस्कारजिल्हा सैनिक कल्याण विभागपुणे यांच्यामार्फत प्रदान करण्यात येणार आहे.

 तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक/ पत्नी / पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी आपले प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे 15सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावे. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाहीयाची सर्व संबंधित माजी सैनिक / विधवांनी नोंद घ्यावीअसे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीचंद्रपूर यांनी केले आहे.

000000


No comments:

Post a Comment