Search This Blog

Thursday 8 August 2024

चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत मिळणार संपूर्ण पीक विमा रक्कम


 

चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत मिळणार संपूर्ण पीक विमा रक्कम

Ø विहित मुदतीत अपात्र न ठरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पात्र ठरवा!

Ø राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून विमा कंपनीला स्पष्ट निर्देश

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंत्रालयात आढावा बैठक

Ø जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंत्री मुनगंटीवार सरसावले

चंद्रपूरदि. : पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आणखी मोठा दिलासा मिळाला आहेराज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम कोणतेही कारण न सांगता 31 ऑगस्ट 2024 पूर्वी देण्याचे तसेच विहित मुदतीत अपात्र ठरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पात्र ठरविण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले. यासोबतच  पिक विमा सर्वेक्षणासंदर्भातील त्रुटी आणि अडचणीबाबतही सखोल चर्चा करून कंपनीने शेतकऱ्यांना योग्य सहकार्य करण्याचे आदेशही कृषिमंत्र्यांनी दिले.

पीक विमा रकमेच्या संदर्भात तसेच विमा कंपनीसंदर्भातील विविध तक्रारी संदर्भात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत कृषिमंत्री श्री. मुंडे यांच्या दालनात बुधवारी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या सचिव व्ही. राधा,  मुख्य सांख्यकी वैभव तांबे, विभागीय कृषि सहसंचालक शंकर तोटावारओरिएंटल विमा कंपनीचे मुंबई कार्यालयातील व विभागस्तरवरील अधिकारी व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळ यांची सविस्तर बैठक पार पडली.

जिल्ह्यातील पिक विमा रकमेचा आढावा घेत असताना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ऑनलाईनद्वारे  42183 आणि ऑफलाइनद्वारे  18820 अशी एकूण 61 हजार 3 शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सूचनापत्र प्राप्त झालेत्याच्यापैकी 47541 शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात झाले. सर्व्हेक्षणाअंती 15729 शेतकऱ्यांची विमा रक्कम मंजुर करण्यात आली आणि 25434 शेतकऱ्यांचा विविध कारणानी विम्याचे दावे विमा कंपनी कडून नाकारण्यात आलेपरंतु उर्वरित सर्वं दावे मंजूर करून सर्वं शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्याचे आदेश आज बैठकीत देण्यात आले. विहित मुदतीत अपात्र न केलेले अर्जही पात्र करण्याबाबतचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले.

काढणी पश्चात जोखमी अंतर्गत शेतकऱ्यांचे ऑनलाइन 39826 व उर्वरित ऑफलाइन 9492 असे एकूण 49 हजार 318 तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेतत्यापैकी 27 हजार 523 शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण केलेले नाहीते सर्व अर्ज पात्र करण्याबाबत तसेच सर्वेक्षण केलेले 21 हजार 795 पैकी 971 शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आला. उर्वरित 19560 शेतकऱ्यांचे विविध कारणामुळे नाकारण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याचे आदेश आजच्या बैठकीत कृषिमंत्र्यांनी दिले.

दरम्यानचंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर रक्कम रुपये 208 कोटी 40 लाख 31 हजार पैकी 127 कोटी 74 लाख 11 हजार रुपये रक्कम प्रलंबित आहे. यापैकी तसेच उर्वरित सर्व रक्कम 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अदा करण्याचे कृषी मंत्र्यांच्या निर्देशानुसार विमा कंपनीने मान्य केले या रकमेपैकी 40 कोटी रुपये एवढी विम्याची रक्कम बुधवारी ऑनलाइन पोर्टलवर अदा करण्यासाठी अपलोड करण्यात आल्याचे विमा अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 955 शेतकऱ्यांना 208 कोटी 40 लाख 31 हजार रूपये विम्याची रक्कम नुकसान भरपाई पोटी देण्याचे शासनाने मंजूर केले. यापैकी 86655 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 20 हजार रुपये वाटप करण्यात आले आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील नंदू रणदिवेबंडू गौरकरशंकर विधातेविनोद देशमुखचंदू नामपल्लिवारदेवानंद नारमलवारविवेक ठीकरेसचिन गुरनुले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची संवेदनशील भूमिका आणि पुढाकार! :  जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा कदापी दुःखात असू नयेअतिवृष्टीमुळे त्याच्यावर आलेल्या संकटात आपण सर्वोपरि सहकार्य केले पाहिजेशासनाकडून त्यांच्यासाठी कुठलीही कमतरता राहणार नाही, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी पिक विमा योजनेचा विषय पूर्णतः लावून धरला. यासाठी प्रलंबित रक्कम मिळावी म्हणून कृषीमंत्र्यांची सर्वप्रथम भेट घेतलीत्यानंतर मुदत वाढीसाठी सुद्धा कृषिमंत्र्यांना भेटून अंतिम तारीख 31 जुलै 2024 पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून मंजूर करून घेतला. चंद्रपूर येथे नियोजन भवनात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना अहवाल तयार करायला सांगितलायानंतर कृषिमंत्र्यांशी बोलून आज ही बैठक तातडीने घेत पिक विमा योजनेचा विषय मार्गी लावला.  संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार धावून आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

००००००

No comments:

Post a Comment