Search This Blog

Tuesday 27 August 2024

28 व 29 ऑगस्ट रोजी उद्योजकांसाठी विविध कार्यशाळेचे आयोजन

 

28 व 29 ऑगस्ट रोजी उद्योजकांसाठी विविध कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूरदि. 27 : महाराष्ट्र शासनाच्या रॅम्प प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र  लघुउद्योग विकास महामंडळ, (MSSIDC) मुंबई व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर यांच्या विद्यमाने उद्योजकांसाठी डिजिटल लोन अप्लिकेशन व फायनान्शियल नॉलेज या विषयावर तसेच बांबु हस्तकला या विषयावर 28 व 29 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेचा उद्देश सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSME)   क्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवणे हा आहे. या प्रकारचा कार्यक्रम किंवा धोरण विशेषत : वित्ततंत्रज्ञानकौशल्य विकासबाजार प्रवेश आणि नियामक अनुपालन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये समर्थन प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. एम.एस.एम.ईं.ना विकासनवनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेत अधिक प्रभावीपणे योगदान देण्यासाठी सक्षम करणे हे उद्दिष्टआहे. सदर कार्यशाळा नि:शुल्क असून  यात तज्ज्ञ व्यक्तींद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.

तरी इच्छुक उद्योजकांनी सदर कार्यशाळेध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उद्योग भवनदुसरा मजलाबस स्टॅन्ड समोरचंद्रपूर येथे संपर्क साधावा, किंवा संदीप जाने (मो. 9637536041), करुणा शिंदे (मो. 8308643200) यावर संपर्क करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संदीप जाने यांनी केले आहे.

०००००


No comments:

Post a Comment