Search This Blog

Wednesday 21 August 2024

परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 163 लागू

 परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 163 लागू

Ø 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

चंद्रपूर दि. 21 : महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2024 ही चंद्रपूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर 25 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये (जुना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144) आदेश लागू करण्यात आले आहे.

या आदेशान्वये 25 ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. तसेच या कालावधीत नियमित व रोजच्या वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत झेरॉक्सफॅक्सएसटीडी बूथपेजरमोबाईल फोनइमेलइंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील. सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांना लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहीलअसे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

ही आहेत परीक्षा केंद्र : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा चंद्रपूर शहरातील 10 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. यात विद्याविहार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तुकुमसरदार पटेल कॉलेज गंज वार्डबीजेएम कॉर्मेल अकादमी तुकुमरफी अहमद किडवई हायस्कूल घुटकाळासेंट मायकल इंग्लिश स्कूल नगीना बागबजाज  पॉलीटेक्निक बालाजी वार्डमाउंट कार्मेल कॉमेंट हायस्कूल शास्त्रीनगर मुल रोडमातोश्री विद्यालय ताडोबा रोड तुकुमचांदा पब्लिक स्कूल दाताळा रोड रामनगरआणि भवानजीभाई चव्हाण हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मुल रोड चंद्रपूर येथे होणार आहे.

0000000

No comments:

Post a Comment